मुंबई : क्रिकेटमधील 'बाहुबली' विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघं नुकतेच एका जाहिरातीमध्ये एकत्र पहायला मिळाले. मात्र, आता असं वाटत आहे की अनुष्कानंतर विराट कोहलीची जादू बॉलिवूड डायरेक्टर करण जोहरवर झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, करण जोहरची नजर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवर आहे. कारण, करण जोहरने आपल्या ट्विटरवर एक ट्विट करत याची हिंट दिली आहे.


करण जोहरने एक ट्विट करत म्हटलं आहे की, विराट कोहली आणि अनुष्का शर्माची जाहिरात पाहिली. यामधील विराटचा अभिनय फार आवडल्याचं म्हटलं आहे.


करण जोहरच्या या पोस्टनंतर अंदाज वर्तवण्यात येत आहे की, अनुष्का आणि विराट यांना ऑन स्क्रिन रोमान्स करताना लवकरच पहायला मिळेल. मात्र, यासंदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये.



काही दिवसांपूर्वीच विराट आणि अनुष्का यांनी मान्यवरसाठी एकत्र जाहिरात केली होती. या जाहिरातीत विराट-अनुष्का एकमेकांना सात वचन देताना दिसत आहेत.


विराट कोहली आणि अनुष्का रिलेशनमध्ये आहेत. अनेकदा दोघांना एकत्र पाहीलं आहे. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी विराट-अनुष्का डिसेंबर महिन्यात साखरपूडा करणार असल्याचंही वृत्त समोर आलं होतं. मात्र, त्यानंतर अनुष्काने यावर आपलं स्पष्टीकरण दिलं होतं.