Karan Johar on Gadar 2 : करण जोहर हा आपल्या हटके दिग्दर्शनासाठी ओळखला जातो. त्याच्या चित्रपटाचे आपण कायमच फॅन्स आहोत. महिन्याभरापुर्वी त्याचा Rocky Aur Rani Ki Prem Kahani हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. त्यामुळे सध्या त्याच्या या चित्रपटाचीही जोरात चर्चा रंगलेली दिसते आहे. त्याचा हा बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर Gadar 2 हा चित्रपट चित्रपटगृहात धडकला आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. आतापर्यंत 500 कोटी कमावत या चित्रपटानं इतिहास रचला आहे. यावेळी या चित्रपटाच्या यशानं अख्ख्या बॉलिवूडला नवसंजीवनी मिळाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यावेळी खरंतर चर्चा आहे ती म्हणजे करण जोहरची. नुकत्याच एका मुलाखतीतून त्यानं 'गदर 2'बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या सनी देओलच्या संपुर्ण कुटुंबियांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द इंडियन एक्सप्रेस'च्या 'एक्सप्रेस अड्डा'ला दिलेल्या मुलाखतीत यावेळी करण जोहरनं Gadar 2 ची प्रसंशा केली आहे. परंतु यावेळी त्याच्या बोलण्यावरून त्याला याचा आनंदही झाला होता सोबत बॉलिवूडमध्ये काहीतरी चांगलं घडताना दिसत आहेत याबद्दल त्याच्या मनात आनंदाचे अश्रूदेखील होते. यावेळी तो Gadar 2 बद्दल बोलताना म्हणाला की, '' सगळ्यांच्या मनावर गदर 2 नं अधिराज्य गाजवलं आहे. त्यातून या चित्रपटानं फक्त आजचं नाही तर 2001 मध्ये देखील फार कमालीचे यश मिळवले होते. हे खूप मोठं यश आहे. मला फार मनापासून आभार मानायचे आहेत ते म्हणजे संपुर्ण सिंगल स्क्रिन्सचे.'' असं तो यावेळी म्हणाला आहे. त्यामुळे त्याच्या या प्रतिक्रियेची सर्वत्र चर्चा आहे. यावेळी गेल्या काही वर्षांत खासकरून 2020 नंतर बॉलिवूडला फार मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं आहे.  


यावर्षीही बॉलिवूड हे टार्गेटवर होते. आता Gadar 2 मुळे प्रेक्षक चित्रपटगृहात येतो आहे आणि गर्दी करतो आहे ही एक आनंदाची बाब आहे. त्यातून यावर्षी आलेल्या 'पठाण' या चित्रपटावरूनही बराच वाद निर्माण झाला होता. त्याबरोबर या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकीनीवरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यातून 'लाल सिंग चड्ढा' पासून खुद्द करण जोहरच्या नावे बॉयकॉट बॉलिवूडचे नारे लागले होते. 


भुस्खलनात अडकले होते ज्येष्ठ अभिनेते, हेही वाचा : हिमाचल भूस्खलनातून बचावले 'तारक मेहता' फेम अभिनेते; त्यांच्या तोंडून 'ती' भयानक आठवण ऐकून डोळ्यातून येईल पाणी


अशावेळी करण जोहर म्हणाला की, '' मला वाटलं की बॉलिवूड जे करतंय त्याचा काही प्रोब्लेम आहे. आम्हाला अनेक वाईट दिवसांचा भुतकाळात सामना करावा लागला आहे. एक दोन वर्षे तरी आमची फारच वाईट गेली आहेत. परंतु त्याचा अर्थ असा नाही की, 'बॉयकॉट बॉलिवूड' किंवा 'दे आर डेड', 'द साऊथ इज टेकींग ओव्हर' नाही असं काहीच नाही. दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टी ही खूप मोठी आहे. ''