मुंबई : धर्मा प्रोडक्शनच्या माध्यमातून एकाहून एक हिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक करण जोहरचे (Karan Johar) वैयक्तिक आयुष्य अनेकदा लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरतो. काही काळापूर्वी इंडस्ट्रीत एक बातमी पसरली होती की करण जोहर 'बायसेक्शुअल' आहे आणि सुपरस्टार शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) रिलेशनशिपमध्ये आहे. काही लोकांनी असेही म्हटले की शाहरुख करणच्या खासगी इच्छा पूर्ण करतो आणि म्हणून करणच्या प्रत्येक चित्रपटात तो सतत असतो. करण आणि शाहरुखमध्ये खूप चांगली मैत्री आहे, ज्याची उदाहरणे लोक देतात यात शंका नाही. पण जेव्हा दोघांच्या नात्यावर असे प्रश्न उपस्थित होऊ लागले तेव्हा करणने त्याच्या 'अॅन अनसुटेबल बॉय' या पुस्तकातून लोकांची तोंडे बंद केली होती.


आणखी वाचा : 'या' अभिनेत्रींनी ऑनस्क्रीन बाप - बेटा दोघांसोबत केला रोमान्स, यादीतील चौथ्या क्रमांकाचं नाव वाचून व्हाल आवाक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पुस्तकात करणनं त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक नकळत पैलूंबद्दल सांगितले, त्यानं पुस्तकात लिहिले की, 'माझ्या लैंगिक प्रवृत्तीबद्दल सर्वांनाच माहिती आहे, मग मी ओरडून सर्वांना काय सांगू?' स्वतःच्या आणि शाहरुखच्या नात्यावर तो म्हणाला होता की, 'कोणी आपल्या भावासोबत असं करू शकतो का? लोक त्यांना पाहिजे ते ऐकतात आणि बोलतात.'


आणखी वाचा : Gauri Khan च्या भावानं Shahrukh Khan वर रोखली बंदूक!


याविषयी पुढे लिहिताना करण म्हणाला होता की, 'मी एकदा एका हिंदी वाहिनीच्या शोमध्ये गेलो होतो, तिथे मला शाहरुखबद्दल सांगण्यात आले की, त्याचे तुझ्यासोबत खूप अनोखे नाते आहे, त्याने मला अशा प्रकारे विचारले की मला खूप राग आला. मी म्हणालो, 'तू तुझ्या भावासोबत झोपला आहेस का असे मी विचारले तर तुला कसे वाटेल?' तर तो पत्रकार म्हणाला, ' तुम्हाला काय म्हणायचे आहे?'


आणखी वाचा : Kareena Kapoor ते Ranveer Singh पर्यंत 'हे' सेलिब्रिटी पार्टनरला पाहताच करतात Lip Lock


हा प्रश्न फक्त करणलाच विचारला गेला नाही, तर हा प्रश्न एका मुलाखतीत शाहरुखलाही विचारण्यात आला होता, तेव्हा शाहरुखनं अगदी शांतपणे आणि स्पष्टपणे सांगितले की, 'करण माझा वॉर्डरोब खूप दिवस सांभाळतो, आम्ही झोपतो, एकमेकांना मिठी मारतो, तर त्यात काय चूक आहे?'