Karan Johar : बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा शो सतत चर्चेत असतो. या शोचं आता 8 वं पर्व सुरु आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये करण जोहरनं त्याच्या मेंटल हेल्थविषयी खुलासा केला होता. त्यानं रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणला सांगितलं की नीता अंबानी यांच्या NMACC कार्यक्रमात त्याला एंग्जायटी अटॅक आला होता. करण जोहरना हा मोठा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करणनं या एपिसोडमध्ये याविषयी सांगत असताना सांगितले की त्याला अचानक खूप घाम येऊ लागला आणि पूर्ण चेहऱ्यावर घाम आला तरी त्याला कळलं नाही. तो थरथरत होता आणि लगेच घर निघून गेला. घरी गेल्यानंतर तो त्याच्या बेडरूमध्ये जाऊन तो खूप रडला, तर कार्यक्रमात त्याला असे वाटत होते की त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे. हा आजार एक मेंटल डिसऑर्डर आहे. या प्रकरणात रुग्णाच्या मानसिक परिस्थिती खराब होते. मेडलाइन प्लसनं दिलेल्या माहितीनुसार, त्याचा झटका रुग्णाला मानसिकरित्या कमकुवत बनवतो आणि सेन्सेटिव्ह बनवतो. 



करण म्हणाला की तो डिप्रेशनचा शिकार झाला होता आणि NMACC लॉन्चच्या दरम्यान त्याला एंग्झायटी अटॅक आला होता. 'त्यादिवशी मला डिप्रेशन झाल्याची जाणीव झाली. मला अचानक अटॅक आला, त्यावेळी माझ्यासोबत वरुण धवन होता, जेव्हा त्याला कळलं तेव्हा तो माझ्याकडे धावत आला आणि त्यानं माझा हात धरला आणि विचारलं की मी ठीक आहे ना... मी त्याला उत्तर देत नाही असं म्हणालो.' 


हेही वाचा : पुष्कर श्रोत्रीच्या घरी 10 लाख रुपयांची चोरी; दागिने... परदेशी चलन सगळं लांबवलं, चोर ओळखीतलाच


करण जोहरनं पुढे सांगितलं की 'त्यावेळी मी खूप घाबरलो होतो कारण मी मोठ्यानं श्वास घेऊन लागलो होतो. मला वाटलं की मला हृदयविकाराचा झटका आला. रुममध्ये मी अर्धा तास आराम केला आणि मग मी माझ्या घरी निघून गेलो. घरी जाऊन मी माझ्या रुममध्ये गेलो आणि मग खूप रडलो. या दरम्यान, माझ्या काहीच लक्षात येत नव्हतं की मला नेमकं काय होतंय. पुढे करण म्हणाला की दुसऱ्या दिवशी मी लगेच काऊंसिलरकडे गेलो आणि मला काय काय झालं ते सगळं सांगितलं. त्यानंतर त्यानं मला मेडिटेशन करण्यास सांगितलं आणि मी अजूनही मेडिटेशनवर आहे.'