करणच्या प्रश्नांना सेलिब्रिटी घाबरले? `कॉफी विथ करण`बाबत मोठी अपडेट आली समोर
Koffee With Karan Season 9: कॉफी विथ करणबाबत करण जोहरने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Koffee With Karan Season 9: नेपोटिझम, बॉलिवूडमधील लव्ह अफेअर्स, कलाकाराची दुष्मनी यासारख्या असंख्या बॉलिवूड गॉसिपमुळं चर्चेत असलेला शो म्हणजे करण जोहर याचा कॉफी विथ करण. पण कॉफी विथ करणच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण दिग्दर्शक आणि कार्यक्रमाचा होस्ट करण जोहर लवकरच या शोमधून ब्रेक घेणार आहे. त्यामागचं कारणही त्याने स्पष्ट केले आहे. ते कारण ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.
'कॉफी विथ करण' या शोमधून चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दलचे गॉसिप ऐकायला मिळतात. कलाकारांच्या आयुष्यात डोकवण्याची संधी मिळते. मात्र, आता कॉफी विथ करणचा नववा सीझन थेट पुढील वर्षीच येणार आहे. त्याचे कारणही करणने स्पष्ट केलं आहे. करण म्हणतो की, 'कॉफी विथ करणच्या मागील सिझनमध्ये त्याला स्वतःलाच आवडला नव्हता. त्याला काम करताना आनंदही घेता आला नाही. कलाकार पूर्वीप्रमाणे बेधडकपणे व्यक्त होत नाहीत. त्यामुळं माझाच शो बघताना मला डुलक्या येत होत्या.'
करण जोहरने पुढे म्हटलं आहे की, 'यावर्षी मी नवीन सिझन करणार नाहीये. मला माझ्या शोला नवीन पद्धतीने सादर करायचं आहे. त्यासाठी मी एक वर्षाचा ब्रेक घेणार आहे. कॉफी विथ करणचा नववा सिझन 2025च्या सेकंड हाफमध्ये येईल,' अशी घोषणा त्याने केली आहे. सुचित्रा त्यागी यांना दिलेल्या एका मुलाखतीत करणने ही घोषणा केली आहे.
'कॉफी विथ करणच्या इतिहासात आठव्या सीझनमधील रॅपिड फायर सगळ्यात जास्त बोरिंग होता. शो बघताना मलाच डुलक्या येत आहेत की काय असं वाटतं होतं. मला असं वाटतं होतं की मी हे का करतोय? मला प्रश्नांची योग्य उत्तरे मिळत नव्हती. रॅपिड फायर बंद करावं का? असं मला वाटतं होती. हॅम्पर मीच घरी घेवून जावं असं मला वाटतं होतं. कारण खरं तर कोणीच ते जिंकण्यायोग्य नाहीये,' असं करणने म्हटलं आहे.
'कॉफी विथ करणचे स्वरुपचं बदलणार आहे. सीझन 9 मध्ये फन, गप्पा आणि बेधडकपणा असणार आहे. मात्र, कलाकार याला काहीतरी वेगळंच किंवा सेंसिटिव्ह स्पेस समजणार नाही. तुम्ही त्यांना कोणता चित्रपट ओव्हरेटेड आणि किंवा कोणाचा परफॉर्मन्स ओव्हरेटेड आहे हे त्यांच्याकडून वदवून घेता येणार नाही,' अशी खंतही करणने व्यक्त केली आहे.
करणने पुढे म्हटलं आहे की, '2024मध्ये त्यांनी सुट्टी घेतली आहे आणि 2025मध्ये तो पुन्हा परतणार आहे. हा शो या वर्षातील सेकंड हाफमध्ये परत येणार आहे. एका नव्या शैलीत कॉफी विथ करण पुन्हा येईल.'