सोशल मीडियावरील लोकप्रिय जोडप्याच्या नात्याचा हृयद्रावक अंत; विवेकची आजारपणाची झुंज संपताच पत्नी एका क्षणात कोलमडली

  ज्याने आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले आहे त्यालाच या दुःखाची जाणीव होऊ शकते असं म्हणतात. पण विवेकच्या निधनानंतर सोशल मीडिया हळहळ व्यक्त केली जात आहे. विवेक पानगेंची पत्नी श्रीजना पतीच्या दुःखाशी दोन हात करत आहे. दोघेही वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी एकमेकांपासून वेगळे झाले. विवेकला स्टेज 3 ब्रेन कॅन्सर झाला होता. अशा परिस्थितीत त्यांची पत्नी श्रीजना सुबेदीने विवकेच्या कठीण काळात त्याला खंबीरपणे साथ दिली. दोघांचे प्रेम दोन शरीर, एक जीव असे होते. पण विवेकचे या जगातून जाणे सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. या दोघांच्या अजरामर प्रेमकथेचे काही फोटो आणि त्यांची लव्हस्टोरी पाहणार आहोत. 

| Dec 20, 2024, 13:27 PM IST

Social Media Sensation Bibek Pangeni Died:  ज्याने आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले आहे त्यालाच या दुःखाची जाणीव होऊ शकते असं म्हणतात. पण विवेकच्या निधनानंतर सोशल मीडिया हळहळ व्यक्त केली जात आहे. विवेक पानगेंची पत्नी श्रीजना पतीच्या दुःखाशी दोन हात करत आहे. दोघेही वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी एकमेकांपासून वेगळे झाले. विवेकला स्टेज 3 ब्रेन कॅन्सर झाला होता. अशा परिस्थितीत त्यांची पत्नी श्रीजना सुबेदीने विवकेच्या कठीण काळात त्याला खंबीरपणे साथ दिली. दोघांचे प्रेम दोन शरीर, एक जीव असे होते. पण विवेकचे या जगातून जाणे सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. या दोघांच्या अजरामर प्रेमकथेचे काही फोटो आणि त्यांची लव्हस्टोरी पाहणार आहोत. 

1/6

क्षणाक्षणाला दिली साथ

पतीला दवाखान्यात हाताने भरवणे असो किंवा वाढदिवस साजरा करणे असो, या जीवघेण्या आजाराच्या काळात तिने आपल्या पतीला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. हे पाहून विवेकचेही डोळे कितीतरी वेळा ओले झाले.

2/6

पत्नी असावी तर अशी

श्रीजीता आणि विवेकचे प्रेम असे होते की, जेव्हा विवेकला कॅन्सरच्या उपचारादरम्यान केस कापावे लागले तेव्हा श्रीजीतानेही तिचे लांब केस कापून लहान केले.

3/6

कोण आहे विवेक पंगेनी?

विवेक पंगेनी, 36, जॉर्जिया विद्यापीठात भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करणारा नेपाळी पीएचडी विद्यार्थी होता. तो यूजीए नेपाळी स्टुडंट असोसिएशनमध्ये खूप सक्रिय होता आणि अमेरिकेतील नेपाळी विद्यार्थ्यांना त्याने खूप पाठिंबा दिला. पण 2023 मध्ये त्यांना स्टेज थ्री कॅन्सर झाला. त्यानंतर त्याची पत्नी श्रीजना सुबेदी सर्व काही सोडून पतीची केअर टेकर बनली. पतीची सेवा करण्यासाठी तिने रात्रंदिवस स्वत:ला झोकून दिले की त्यांचे प्रेम सर्वांसाठी उदाहरण बनले.

4/6

दोघं झाले एकमेकांपासून वेगळे

कर्करोगाच्या उपचारादरम्यान, श्रीजना सोशल मीडियावर सकारात्मक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत राहिली. दोघेही हळूहळू लोकांसाठी प्रेरणास्थान बनले. त्यांच्या प्रेमकथेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो प्रत्येकाचे हृदय पिळवटून टाकत आहे. दोघांचं एकमेकांवर असलेलं अतोनात प्रेम आज जगासमोर खऱ्या प्रेमाचं उदाहरण आहे. 

5/6

स्टेज 3 च्या कॅन्सरने घेतला जीव

श्रीजना आणि विवेक पानगेंचा हा फोटो सर्वाधिक व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये विवेक पानगेंच्या कॅन्सरच्या आधीचे आणि नंतरचे दोन फोटो आहेत. विवेक पानगेंची पत्नी श्रीजना पतीच्या उपचारात कोणतीही कसर सोडली नाही. या कठीण काळात तिने अजिबात हिंमत हारली नाही आणि पतीसोबत प्रेमाने आणि काळजीने कॅन्सरच्या उपचारादरम्यानचा प्रत्येक क्षण संस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला.

6/6

चाहत्यांसाठी मोठा धक्का

त्यांच्या प्रेमाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत जे पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत. विवेक पानगेनी यांच्या निधनाने सर्वसामान्य आणि सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या आजारपणाच्या प्रवासात त्याच्याशी जोडलेल्या लोकांचा यावर विश्वास बसत नाही.