Aamir Khan ला घाबरून लंडनला पळून गेला होता करण जोहर, नेमकं काय झालं होतं?
Karan Johar and Aamir Khan : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर हा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खानला घाबरून लंडनला पळाला होता. त्याविषयी स्वत: करण जोहरनं त्याची ऑटोबायोग्राफी ‘एक अनोखा लडका’ या पुस्तकात सांगितलं आहे.
Karan Johar and Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आमिर कमी चित्रपट करत असला तरी तो एकावर एक हीट असे चित्रपट देताना दिसतो. आमिरनं आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र, त्याचा एक चित्रपट आहे, जो कोणीही विसरू शकणार नाही, तो म्हणजे ‘लगान’ हा चित्रपट. आमिरचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) हा इतका घाबरला होता की तो परदेशात पळून गेला होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं काय झालं होतं की करण परदेशात पळून गेला होता.
2001 साली आमिर खानचा ‘लगान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या वेळी करणचा ‘कभी खुशी कभी गम’ K3G हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. त्यावेळी नक्की असं काय झालं होतं की करण लंडनला पळून गेला याविषयी त्यानं त्याची ऑटोबायोग्राफी ‘एक अनोखा लडका’ या पुस्तकात सांगितलं आहे.
हेही वाचा : Amruta Fadanvis यांनी घेतली आशा भोसलेंची भेट, आशाताईंनी गायनासंबंधीत दिला हा 'मोला'चा सल्ला
‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटानं करणचं आयुष्य बदललं. हा चित्रपट त्याच्या आयुष्याचा टर्निग पॉइंट होता. या चित्रपटानंतर करणनं पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. हा चित्रपट हिट झाला आणि या चित्रपटामुळे त्याला ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट बनवण्याची प्रेरणा मिळाली. इतकंच काय तर या चित्रपटात करणनं अमिताभ बच्चन, जया बच्चन शाहरुख खान, काजोल, ऋतिक रोशन आणि करीना कपूरला कास्ट केलं होतं. हा चित्रपट सगळ्या चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड मोडणार असं त्याला वाटलं होतं.
दरम्यान, त्याचवेळी आमिरचा ‘लगान’ आणि सनी देओलचा ‘गदर’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावेळी करणला धक्काबसला की असे चित्रपट हिट कसे होऊ शकतात. त्यानंतर अनेक लोक करणसमोरच ‘लगान’ या चित्रपटांची स्तुती करू लागले. तर काही चित्रपट विश्लेषकांनी करणचा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचे निगेटिव्ह रिव्ह्यू दिले, तेव्हा करणला भीती वाटू लागली होती.
करणला भीती वाटू लागली होती की सगळीकडे फक्त ‘लगान’ विषयी चर्चा सुरु आहे. त्याच्या चित्रपटाविषयी कोण बोलत नाही. ‘लगान’ ला ऑस्कर नॉमिनेशन मिळालं. तर दुसरीकडे करणला अवॉर्ड शोला बोलावण्यात देखील येत नव्हतं. अशात घाबरलेला करण लंडनला पळाला. तिथे काही दिवस राहिल्यानंतर करणच्या लक्षात आलं की ‘लगान’ प्रमाणेच त्याच्याही चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तेव्हा काही दिवसांनंतर करण भारतात परत आला होता.