23 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या `या` चित्रपटासाठी काजोल नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंत
पहिल्यापासून करण जोहरची आवडती अभिनेत्री काजोल राहिली आहे. पण एक चित्रपट असा होता ज्यात त्याने काजोल नाही तर ऐश्वर्या रायची निवड केली होती. परंतु, काम न झाल्यामुळे काजोलची निवड करण्यात आली होती.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा 'मोहब्बतें' हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता, जो सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना करण जोहरने त्याच्या पुढील एका चित्रपटासाठी ऐश्वर्या रायची निवड केली होती. पण नंतर त्याला त्या चित्रपटात काजोलला कास्ट करावं लागलं. त्या काळात काजोल आणि शाहरुख खानची जोडी खूपच गाजली होती.
दरम्यान, आपण शाहरुख खान आणि काजोलच्या 'कभी खुशी कभी ग़म' या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. या चित्रपटात काजोलची जोडी शाहरुख खानसोबत होती. पण करण जोहरला या चित्रपटात शाहरुख खान आणि ऐश्वर्या रायची जोडी घेयची होती. हे अनेक वर्षांनी समोर आले आहे.
'कभी खुशी कभी गम' चित्रपटासाठी ऐश्वर्या पहिली पसंत
'ऐ दिल है मुश्किल' हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्याचे दिग्दर्शन करण जोहरने केले होते. या चित्रपटात ऐश्वर्या रायची छोटी पण महत्त्वाची भूमिका होती. ऐश्वर्या रायला कास्ट करून करण जोहरने 16 वर्षांचे स्वप्न पूर्ण केले होते. कोमल नाहटाला दिलेल्या मुलाखतीत करण जोहरने याचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत करण म्हणाला होता, 'मी जेव्हा कभी खुशी कभी गम चित्रपटासाठी कास्ट करत होतो तेव्हा मला वाटले होते की काजोल हा चित्रपट करणार नाही कारण तिचे लग्न झाले होते. त्यामुळे कदाचित तिला कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडेल.'
'मी मोहब्बतें चित्रपटाच्या काही भागांची शूटिंग पाहिली होती. मला ऐश्वर्या राय आणि शाहरुख खानची जोडी आवडली होती. मला वाटले होते की काजोल या चित्रपटाला नकार देईल आणि माझी पहिली पसंती असलेल्या ऐश्वर्या रायला मी कास्ट करेन. त्यादिवशी मी काजोलच्या स्टुडिओत पोहोचलो आणि विचार केला की ती या चित्रपटासाठी नकार देईल. आपण थोडे भावूक होऊ आणि मी तिथून निघून जाईन. पण त्यावेळी सर्व उलटे घडले आणि काजोलने चित्रपटाला होकार दिला. त्यानंतर मी ऐश्वर्याला भेटू शकलो नाही. असं करण जोहरने सांगितले.