मुंबई : हल्ली दर दिवसाआड एखाद्या अभिनेत्री किंवा अभिनेत्याचा, एखाद्या सेलिब्रिटी जोडीचा खासगीतला व्हिडीओ व्हायरल होत असतो. त्यातच आता नव्यानं आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. जिथं रिअॅलिटी शो आणि मालिका जगतामध्ये नावाजलेली अभिनेत्री आणि तिचा प्रियकर अगदी स्पष्टपणे दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅमेरा समोर येताच ही अभिनेत्री काही वेळा चेहराही लपवताना दिसत आहे. तोकड्या कपड्यांमध्येच प्रियकरावर झडप मारून त्याचा आधार घेताना दिसणारी ही अभिनेत्री आहे, तेजस्वी प्रकाश.  (Karan kundra Tejasswi prakash )


तेजस्वी आणि तिचा प्रियकर अभिनेता करण कुंद्रा यांचं नातं आता कोणासाठीही नवं नाही. त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री कायमच चर्चेता भाग ठरते. पुन्हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळं याचीच पुनरावृत्ती झाली आहे. 


रात्री शूटदरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचं कळत आहे. जिथे तेजस्वीच्या पायाच तप्पल नसल्यामुळं ती लहान मुलं एखाद्या माणसाला उचलून घेतल्यावर कशी बिलगून असतात, तशीच करणशीही बिलगलेली दिसत आहे. 


'अरे कोणीतरी हिची चप्पल आणा, अशीच किती वेळ राहणार ही' असं म्हणताना करणही तेजस्वीची गोड खिल्ली उडवताना दिसत आहे. 




10 जून म्हणजेच आज तेजस्वीचा वाढदिवस आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी म्हणून ती प्रियकर करण कुंद्रा याच्यासोबत सध्या गोव्यात आहे. गेल्या काही काळापासून करण आणि तेजस्वी ठिकठिकाणी एकमेकांसोबतच जात असल्याचं पाहायला मिळत आहे. आता या जोडीनं लग्न उरकावं हीच काय ती चाहत्यांची इच्छा.