मुंबई : अभिनेता करण कुंद्रा सध्या तुफान चर्चेत आहे. ‘कितनी मोहब्बत है’ मालिकेतून प्रकाशझोतात आलेला करण आज प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यांपैकी एक आहे. करण आता मालिकेत झळकत नसला तरी चर्चेत मात्र कायम असतो.  कोणत्याही कामामुळे करणची हेडलाईन कायम  तयार होत असते.  'कितनी मोहब्बत है' मालिका प्रचंड हीट झाली. तरुण वर्गामध्ये मालिकेचा बोलबाला होता. पण ज्या मालिकेने चाहत्यांना वेड लावलं. त्या मालिकेतील अभिनेत्याचं मानधन ऐकल तर तुम्हाला देखील धक्का बसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिडिया रिपोर्ट्सनुसार करण कुंद्राला एका एपिसोडसाठी प्रचंड कमी पैसे मिळायचे. ‘कितनी मोहब्बत है’ मालिकेतील एका एपिसोडसाठी करणला फक्त  4 हजार रुपये मिळायचे. 


त्यानंतर करण 'दिल ही तो है' मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस आला. या मालिकेतील एका एपिसोडसाठी करणला 1.20 लाख रुपये मानधन मिळायचं. मालिकेनंतर 'बिग बॉय'मुळे करणच्या करियरला कलाटणी मिळाली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


करण कुंद्रा (Karan Kundra) काही काळापूर्वी 'बिग बॉस 15' मध्ये दिसला होता. तिथे तो तेजस्वी प्रकाश (Tejashwi Prakash) हिच्या सोबतच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत होता. 


यासोबतच तो जेलर म्हणून 'लॉक-अप'पर्यंत पोहोचला होता. तसेच तो सध्या एक टीव्ही शो होस्ट करत आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्री तेजस्वी प्रधानला डेट करत असल्यामुळे देखील करण चर्चेत असतो.