मुंबई : प्रसिद्ध हिंदी टीव्ही मालिका अभिनेता करण पटेल त्याच्या पर्सनल लाईफमुळे कायम चर्चेत असतो. याचबरोबर तो त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला आहे. खासकरून 'ये है मोहब्बतें' या मालिकेने तो घरा-घरात पोहोचला. करणने टीव्ही दुनियेत बरीच मजल मारली आहे. त्याच्या शो व्यतिरिक्त, अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. मात्र, यावेळी अभिनेता आपल्या भूतकाळातील चुका आठवत एका मुलाखतीत व्यक्त झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच मीडियाशी बोलताना करण म्हणाला की, भूतकाळातील चुकांमधून मी खूप काही शिकलो आहे आणि भविष्यात कोणतीही चूक होऊ नये यासाठी मी नेहमीच प्रयत्न करतो. तुम्ही तुमचं अर्ध आयुष्य कठोर परिश्रम करण्यात आणि प्रसिद्ध होण्यात घालवता.  मग तुम्ही सामान्य जीवन गमावल्याची तक्रार देखील करता. मी स्टार बनून सगळं काही मिळवलं आहे आणि काहीही गमावलं नाही. मी खूप चुकाही केल्या आहेत पण मला नेहमी वाटायचं की मी माझ्या चुकांमधून शिकलं पाहिजे आणि त्या सुधारल्या. मी त्याच चुका पुन्हा करत नाही, मी नवीन चुका करतो.


यावेळी करणने त्याच्या करिअरमधील ब्रेकबद्दलही सांगितलं. हा आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ असल्याचं सांगत तो म्हणाला, 'माझ्यामुळे 'कस्तुरी' शो बंद झाला, अनेकांना याबद्दल काहीच माहिती नव्हतं, पण माझ्या चुकीच्या कृत्यांमधून मी धडा घेतला. मला वाटलं की मी माझ्या शूजसाठी खूप मोठा आहे. मी सुपरस्टार झालो होतो. माझ्याशिवाय हा शो चालणार नाही असं मला वाटू लागलं होतं, पण शो बंद झाल्यानंतर मला जाणवलं की कोणीही सुटलेलं नाही.



करणने आपलं संपूर्ण विधान देत त्या आरोपांनाही योग्य ठरवलं ज्यामध्ये अभिनेता अनेकदा नशेच्या अवस्थेत सेटवर यायचा आणि उशिरा पोहोचायचा. या विषयी बोलताना तो म्हणाला, 'हे अगदी खरं आहे. मी अशा चुका केल्या, पण त्यातून धडा शिकलो, प्रत्येकजण  चुकतो. प्रत्येकजण त्या मार्गावर जातो, परंतु योग्य मार्गावर येणं आणि धडा शिकणं महत्वाचे आहे.