बिपाशा बासू आणि करण सिंगच्या पालकत्वाची परीक्षा; लेकीची झाली ओपन हार्ट सर्जरी
अभिनेत्री बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोव्हर हे कपल बॉलिवूडचं लाडकं कपल आहे. या जोडीवर चाहते भरभरुन प्रेम करतात. या दोघांनी ३० एप्रिल २०१६ साली लग्नगाठ बांधली.
मुंबई : अभिनेता करण सिह ग्रोवर आणि त्याची पत्नी बिपाा बसुने २०२२ मध्ये मुलगी देवीला जन्म दिला. त्यांच्या मुलीच्या जन्माच्या तीन महिन्यानंतर त्यांना समजलं की, त्यांच्या मुलीच्या हृद्यात छिद्र आहे. या गोष्टीनंतर करण आणि बिपाशा या जोडीला मोठा धक्का बसला होता. इतकंच नाहीतर मुलीच्या या आजाराबद्दल समजल्यावर करणला 'फायटर'च्या शूटिंगला जाण्याचीही हिंमत होत नव्हती.
करण सिंह ग्रोवरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच त्याला ही धक्कादायक बातमी समजली. त्यामुळे प्रत्येक शेड्यूलच्या सुरुवातीला त्याला कामावर जाऊ नये असं वाटायचं कारण प्रकरण खूप गंभीर होतं आणि दूर राहणं खूप कठीण होतं. आणि मी हे प्रकरण व्यलस्थित हाताळू शकत नव्हतो. मी जमिनीवर पाण्यासारखा होतो. मला असं वाटतं की, बिपाशामुळेच मला यातून मार्ग काढण्याची ताकद मिळाली. मला खरोखर असं वाटलं की त्या काळातून जाणं माझ्यासाठी अजिबात सोपं नव्हतं.
पुढे अभिनेता म्हणाला की, "मला आठवतं, एक वेळ अशी आली जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आणि देवीला डॉक्टरांच्या हवाली करणार होतो. मी यासाठी तयार नव्हतो. जणू माझे हात, पाय आणि तोंड काहीच नव्हतं. मी पुर्णपणे संपून गेलो होतो. माझी पत्नी सिंहिणी आहे. तो खूप बलवान आहे. आई झाल्यानंतर ती देव बनली आहे. ती काहीतरी वेगळीच आहे." असं करण सिंह मुलाखती दरम्यान म्हणाला. बिपाशा बसूने गेल्या वर्षी आपल्या मुलीच्या आजाराचा खुलासा केला होता. तिने सांगितलं होतं की, मुलगी देवी हिच्या हृदयात दोन छिद्रे आहेत. मात्र, आता शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती एकदम ठीक आहे. करण सिंह ग्रोवरने फायटर सिनमात तेज ही भूमिका साकारली आहे. करण आणि बिपाशाने २०२२ साली मुलगी देवीला जन्म दिला. तिच्या मुलीच्या हृद्याला दोन छिद्र होती.
करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बसुचं लग्न ३० एप्रिल २०१६ साली झालं. लग्नाच्या सहा वर्षानंतर कपलला 2 नोव्हेंबर, 2022ला मुलगी झाली. आणि बिपाशा आणि करण सिंह ग्रोवर एका गोंडस मुलीचे पालक बनले. हे कपल आपल्या मुलीच्या जन्माने खूप खुश होते. त्यांच्या परिवाराचा आनंद सातव्या आसमानात होता. मुलीच्या जन्माच्या बरोबर तीन दिवसानंतर या जोडीला समजलं होतं की, त्यांच्या मुली छातीत दोन छिद्र आहेत. हे ऐकल्यानंतर दोघंही खूप घाबरले होते. यानंतर देवीला ओपन हार्ट सर्जरीचा सामना करावा लागला होता. मुलीच्या हार्ट सर्जनीमुळे करण खूप अस्वस्थ होता. मात्र या परिस्थितीत बिपाशाने खूप हिंमत दाखवली होती.