मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान गेल्या एक महिन्यापासून लंडनमध्ये सुट्टी साजरी करत होती. रविवारी अभिनेत्री आपल्या कुटुंबासह मुंबईला परतली. बेबो सातत्याने व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्याचबरोबर करिनाने तिच्या इंस्टाग्रामवर असा एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर, शेअर केलेल्या या फोटोमध्ये तैमूर अली खान त्याचे वडील सैफ अली खान यांच्या विंचेस्टर, इंग्लंडमधील बोर्डिंग स्कूलमध्ये दिसत आहे. त्यांच्यासोबत करिनाने तैमूरच्या गॉडफादरची झलकही दाखवली आहे. हा फोटो शेअर करत करीनाने लिहिलं, 'फादर... गॉडफादर... सन... विंचेस्टर २०२२.' सर्वजण विंचेस्टर कॉलेजच्या ६०० वर्ष जुन्या बोर्ड कॉरिडॉरमध्ये फिरत आहेत.


सैफ निळ्या रंगाचा शर्ट, हाफ स्वेटर, डेनिम्स आणि कॅपमध्ये दिसत आहे. तर तैमूरने हुडी आणि डेनिम्स घातले आहेत. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रतिक्रिया येत आहेत. त्याचवेळी, काहींनी असा अंदाज लावला आहे की, कदाचित आता तैमूर अली खानला देखील त्याचे पालक बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवणार आहेत! आणि म्हणूनच कदाचित त्याला बोर्डिंग स्कूलला भेट द्यायला लावली आहे.


पतौडी कुटुंबात असं नेहमीच होत आलं आहे. मन्सूर अली खान पतौडी शिकण्यासाठी इंग्लंडला गेले. त्यांची मुलं सैफ आणि मुलगी सबा आणि सोहा त्याच्या पावलावर पाऊल टाकत होते. सैफच्या पहिल्या लग्नापासून झालेली मुलगी सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन्ही मुलंही त्याच बोर्डिंग स्कूलमध्ये होती. आता त्यांच्याच पाऊलावर-पाऊल ठेवत तैमूरही तिथे जाऊ शकतो. सध्या मुंबईत तैमूर शिक्षण घेत आहे.



आता तैमूर अली खान बोर्डिंग स्कूलमध्ये जाणार की नाही हे पाहावं लागेल. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर करीना कपूर लवकरच 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. तो 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. हा चित्रपट 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' या जपानी कादंबरीवर आधारित आहे.