मुंबई : कोरोनाचा धोका नक्कीच कमी झाला आहे पण टळलेला नाही. संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सगळ्यात वाईट परिणाम महाराष्ट्रात दिसून आला, जो आत्तापर्यंत कायम आहे.  नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री करीना कपूर खान आणि अमृता अरोरा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएमसीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करीना कपूर आणि अमृता अरोरा या सुपर स्प्रेडर असण्याचीही शक्यता आहे. दोघंही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि त्या अनेक बॉलिवूड स्टार्सना सतत भेटत असतात. तसंच, या दोन्ही अभिनेत्रींनी गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली आहे.


बीएमसीने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या संपर्कातील आणखी काही सेलिब्रिटींचे रिपोर्ट आज येऊ शकतात. दोन्ही अभिनेत्री पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेशही बीएमसीकडून देण्यात आले आहेत. यासोबतच  त्या भेटलेल्या लोकांचे डिटेल्स आणि त्यांचं ट्रेसिंग केलं जात आहे.



करीना कपूर आणि अमृता अरोरा व्यतिरिक्त करिश्मा कपूर, मलायका अरोरा अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. अशा परिस्थितीत त्याच्या संपर्कात आलेल्या इतर बॉलिवूड स्टार्सनाही संसर्ग होण्याची भीती आहे.