मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांची बॉलिवूडचे पॉवर कपल म्हणून ओळख आहे. दोघेही त्यांच्या सिनेमांपेक्षा कौटुंबिक जीवनासाठी जास्त चर्चेत असतात. सैफ आणि करिनाला दोन मुलं आहे. करिना कायम तैमूर आणि जहांगीर अली खान यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. एवढंच नाही, तर सर्वांसमोर पती सैफचं कौतुक करताना करिना मागे-पुढे पाहात नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे करीना आणि सैफ दोन मुलांचे पालक असले तरी, सैफ मात्र सारा और इब्राहिम यांना धरुन 4 मुलांचा वडील आहे. एका मुलाखती दरम्यान करिना म्हणाली, सैफ कितीही व्यस्त असला, तरी चारही मुलांना वेळ देतो. 



मुलाखतीत करिना पुढे म्हणाली, 'सैफने आयुष्यातील प्रत्येक दशकात एका मुलाला जन्म दिला आहे.  त्याला त्याच्या 20, 30, 40 आणि आता 50 मध्ये एक बाळ झालं आहे....  एवढंच नाहीतर, 60 दशकात असं काही होणार नसल्याचं देखील करिनाने यावेळी सांगितलं आहे. 



करिना आणि सैफ दोघे मिळून त्यांच्या मुलांचा सांभाळ करतात. 'मुलांच्या जन्मानंतर आम्ही तडजोड केली आहे. सैफ जेव्हा शुटिंगला जातो, तेव्हा मी घरी असते आणि माझं शूट असेल तर सैफ घरी मुलांची काळजी घेत असतो...'असं देखील करिनाने सांगितलं आहे.


दरम्यान करिना आणि सैफच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती लवकरचं अभिनेता आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा' सिनेमात दिसणार आहे. तर दुसरीकडे सैफ 'विक्रम वेधा' आणि 'आदिपुरुष'मध्ये दिसणार आहे.