मुंबई : करिना कपूर आणि सैफ अली खान यांना लवकरच दुसरं बाळ होणार आहे. करिनाची डिलीवरी पुढच्या वर्षी २०२१ साली फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या स्टार कपलचा दुसरा मुलगा 'कोरोनियल' असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या या 'कोरोनियल' शब्दाची जोरदार चर्चा रंगली आहे. सैफ आणि करिनाचा मुलगा कोरोनियल असणार म्हणजे नक्की काय? याचा नेमका काय अर्थ आहे. 


कोरोनियल ही कुठल्याही आजार व मेडिकल कंडिशनशी संबंधित संकल्पना नाही. ही एक टर्म आहे. कोरोना व्हायरसच्या काळात जन्म घेणाऱ्या मुलांसाठी ही टर्म वापरली जाते. 



२०२० मध्ये आलेल्या कोरोना महामारीकाळात जन्मदरात वाढ झाली आहे. या कोरोना महामारीच्या काळात जन्मलेल्या जनरेशनला 'कोरोनियल' म्हटलं जात आहे. या जनरेशनची बहुतांश मुलं डिसेंबर २०२० नंतर आणि सप्टेंबर २०२१ पूर्वी जन्मतील. एकंदर काय तर कोरोना काळात जन्मलेली मुलं असा टर्मचा सरळसाधा अर्थ आहे. 


तसेच करिना प्रमाणेच अनुष्का आणि विराट कोहलीचं मुलं देखील 'कोरोनियल बेबी' असणार आहे. विरुष्काचं बाळ जानेवारी २०२१ मध्ये बाळाला जन्म देणार आहे. तसेच अभिनेत्री अमृता रावचं बाळ देखील 'कोरोनियल बेबी' असणार आहे. तसेच सागरिका घाटगे देखील कोरोनाच्या काळात अगोदर असल्याची माहिती मिळाली. सागरिका घाटगेने अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिली नाही.