मुंबई : करीना कपूर तिच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मापासून चर्चेत आहे. करीना कपूरचे पुस्तक देखील यापूर्वी लॉन्च करण्यात आले आहे. ज्यात तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी  संबंधित अनेक खुलासे केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता करीना कपूर पती सैफ अली खानसोबत सुट्टीवर मालदीवला गेली आहे. या दरम्यान, त्यांचे दोन्ही गोंडस मुलं जेह आणि  तैमूर अली खान देखील एकत्र आहेत. सैफच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त करीना 14 ऑगस्ट रोजी मालदीवला रवाना झाली होती.


करीनाचा पूल लूक


नुकतेच करीनाने तिच्या चाहत्यांसाठी काही खास फोटो पोस्ट केले. करीना कपूरने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर काळ्या रंगाची बिकीनी परिधान केल्याचा एक फोटो  शेअर केला आहे. बीचवर मजेदार शैलीत बेबो दिसू शकते.




तिची चमकणारी-लालसर त्वचा फोटोत दिसत आहे. करीनाने हे फोटो तिच्या इन्स्टा स्टोरीवर 'बीच बॉम्ब'  च्या स्टिकरसह पोस्ट केले आहेत.


मालदीवमध्ये सैफच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन
 
सैफच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करीना आपल्या दोन्ही मुलांसोबत मालदीवमध्ये पोहोचली. संपूर्ण खान कुटुंब यावेळी एकत्र मजामस्ती करताना दिसून आलं. पहिल्या  फोटोत अभिनेत्री, सैफ, बेबी जेह आणि तैमूर, तर दुसऱ्या फोटोत जोडपे पूलमध्ये आनंद घेताना दिसत आहेत.