`या` कारणामुळं करीना-शाहिदच्या नात्याला गेलेला तडा
करीनाचा आज ४० वा वाढदिवस
मुंबई : बॉलिवूडची बेबो म्हणजे करीना कपूरचा आज ४० वा वाढदिवस आहे. २१ सप्टेंबर १९८० रोजी मुंबईत करीनाचा जन्म झाला. करीना अनेकदा आपला वाढदिवस परदेशात साजरा करते. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे करीना आपला वाढदिवस घरीच साजरा करत आहे.
करीना ऑक्टोबर २०१२ मध्ये पटौदी कुटुंबियांचा चिराग सैफ अली खानसोबत लग्न केलं. पटौदी कुटुंबियाची सून होण्याअगोदर करीना कपूर आणि शाहिद कपूरचं नाव चर्चेत होतं.
करीनाची शाहिद कपूरसोबत लव्हस्टोरी सुरू झाली ती २००४ च्या फिदा सिनेमापासून. करीनानेच शाहिदला लग्नासाठी प्रपोझ केलं आहे. करीनानेच ही गोष्ट एका मुलाखती दरम्यान सांगितली होती. अनेक फोन आणि मॅसेज केल्यानंतर शाहिदने करीनाला होकार दिला होता.
२००४ सुरू झालेलं हे अफेअर फक्त बी-टाऊनमध्येच नाही तर मीडियामध्ये देखील चर्चेत होतं. अनेकदा या दोघांना एकत्र पाहिलं आहे. दोघांनी अनेकदा सार्वजनिक ठिकाणी आपलं नातं स्विकारलं आहे. मात्र या प्रेमात मिठाचा खडा पडला तो 'जब वी मेट' सिनेमात एकत्र काम केलं तेव्हा.
२००६ मध्ये दोघं जेव्हा 'जब वी मेट' शुटिंगच्या वेळी भेटले तेव्हा त्यांच नातं चांगल होतं. मात्र सिनेमा संपता संपता दोघांच्या नात्यात दरार पडू लागले. सेटवर उपस्थित असणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार दोघांमध्ये बोलणं कमी झालं होतं.
'जेब वी मेट' सिनेमाच्या शेवटच्या सीनच्यावेळी तर दोघं वेगवेगळ्या गाडीतून आले होते. यानंतर अशी चर्चा होती की, शाहिद आणि करीनाचं नातं तुटण्याला जबाबदार अमृता राव ही अभिनेत्री आहे. २००६ मध्ये 'विवाह' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अमृता आणि शाहिदमध्ये जवळीक वाढली. आणि याचा संशय करीनाला आला होता.
काही लोकांनी ही गोष्ट पण नाकारली. असं ही म्हटलं जातं की, करीना-शाहीदच्या ब्रेकअपला करिश्मा कपूरला देखील जबाबदार ठरवलं. करिश्माला शाहीद अजिबात पसंत नव्हता.
ही गोष्ट तेव्हा अधोरेखित झाली जेव्हा २००७ मध्ये लॅक्मे फॅशन वीक दरम्यान करीना, सैफ अली खान एकत्र दिसले. ब्रेकअपचा शेवटचा फोन हा शाहिदकडून करण्यात आला होता. करीनाने हे नातं तुटल्यानंतरही अनेकदा प्रयत्न केल्याचं समजतं.
शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीनाने आपल्यापेक्षा १० वर्षाने मोठ्या असलेल्या सैफ अली खानचा हात धरला. १६ ऑक्टोबर २०१२ मध्ये करीना-सैफचं लग्न झालं.