मुलांसाठी करीनाचा मोठा निर्णय, बदलावं लागलं राहतं घर
करीना कपूर जहांगीरच्या जन्माच्या काही आठवड्यांपूर्वी वांद्रे येथील नवीन घरात शिफ्ट झाल्याचे सांगितले जाते.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर गरोदरपणावर लिहिलेल्या 'प्रेग्नेंसी बायबल' या पुस्तकामुळे सध्या चर्चेत आहे. दररोज त्याच्याशी संबंधित काही ना काही नवीन ती पोस्ट करताना दिसते. अलीकडेच, या पुस्तकाद्वारे, तिचा दुसरा मुलगा जेह, जहाँगीरचे पूर्ण नाव सर्वांसमोर आले होते आणि आता त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याची बरीच चर्चा होत आहे. हे फोटो तिच्या प्रेग्नेंसी बायबल या पुस्तकातून समोर आले आहे.
करीना कपूर जहांगीरच्या जन्माच्या काही आठवड्यांपूर्वी वांद्रे येथील नवीन घरात शिफ्ट झाल्याचे सांगितले जाते. या काळात करीनाने गृह प्रवेशाची पूजा ठेवली होती. या फोटोमध्ये करीना कपूर स्वतः किचनमध्ये उभी राहून फुलांची पूजा करताना दिसत आहे आणि तिच्या भोवती पूजेची थाळी दिसत आहे. या फोटोमध्ये करीना गॅसवर दूध उकळताना दिसत आहे.
तिने लाईट ग्रीन कलरचा अनारकली सूट घातला आहे. कोरोनामुळे तिने चेहऱ्यावर मास्कही लावला आहे. हा फोटो तिच्या एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो करीना 8 महिन्यांची गर्भवती असताना पोस्ट करण्यात आला आहे.
करिना सैफने आपल्या नवीन घराबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर तिला दुसऱ्या खोलीची गरज आहे. त्यानंतर त्यानी घर बदलण्याचा निर्णय घेतला. करीना बऱ्याचदा सोशल मीडियावर सक्रिय असते. यामुळे तिच्या नवीन घराचे फोटोही लोकांसमोर आली आहेत. एका फोटोत करीना योगा करताना दिसत आहे. ज्यात या घराची बाल्कनीत ती दिसून येत आहे.