चिमुकल्या तैमुरला लंडनलाच सोडून भारतात परतली करीना कपूर
पती सैफ अली खान आणि चिमुकल्या तैमूरशिवाय...
मुंबई : बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान गेल्या काही दिवसांपासून पती सैफ अली खान आणि छोटा नवाब तैमूरसोबत लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत होती. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार करीना कपूर मुंबईला परतलीय... पती सैफ अली खान आणि चिमुकल्या तैमूरशिवाय... सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेबो मुंबईत केवळ दोन दिवसांसाठी आलीय. करीनाचं मुंबईला परतण्याचं
एक कारण म्हणजे तिचा एका नियोजित कार्यक्रमातला परफॉर्मन्स... करीनाचा 'मिस इंडिया पेजेंट'मध्ये एक परफॉर्मन्सही आहे.
या कार्यक्रमात करीना आपल्या सिनेमाच्या अनेक गाण्यांवर परफॉर्म करणार आहे. या परफॉर्मन्सनंतर करीना पुन्हा पती सैफ आणि मुलगा तैमूरजवळ लंडनला परतणार आहे. पण तेव्हापर्यंत तैमूरची जबाबदारी करीनानं पती सैफ अली खानकडे सोपवलीय.
करीनाचा नुकताच 'वीरे दी वेडिंग' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही लाभलाय.
पुढच्या काही दिवसांत करीना कपूर करण जोहरच्या प्रोडक्शनच्या एका सिनेमात दिसणार आहे. याचं दिग्दर्शन राज मेहता करणार आहेत. या सिनेमात करीना अभिनेता अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. या सिनेमाचं शुटिंग २०१९ मध्ये सुरु होणार आहे.