मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी कायमच माहिती देत असते. करीनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर तिच्या चाहत्य़ांना गुड न्यूज दिसी आहे. ही गुडन्यूज ऐकुन तिचे चाहते तिचं भरभरुन कौतुकही करताना दिसत आहे. काहि दिवसांपूर्वी करिनाने एका मुलाला जन्म दिला. आणि करिना दुसऱ्यांदा आई बनली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी काय दिली करिनाने गुडन्यूज?
करिनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती स्वयंपाकघरात उभी आहे आणि बेकिंग ट्रेमधून तिचं पुस्तक बाहेर काढते. व्हिडिओ शेअर करताना करीनाने लिहिलं की, हा माझा प्रवास आहे. माझं गर्भधारणा आणि माझे गर्भधारणा पुस्तक बायबल. काही चांगले दिवस होते तर काही वाईट होते. काही दिवस मला कामावर जाण्याची घाई होती आणि काही दिवस अंथरुणावरुन बाहेर पडणेही कठीण होतं. माझ्या दोन्ही गर्भधारणेदरम्यान मी माझ्या शारीरिक आणि भावनिक अनुभवांबद्दल लिहिलं आहे म्हणून हे पुस्तक माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. करिनाने आज आपल्या खास बायबल या पुस्तकाची घोषणा केली आहे. या पुस्तकात तिने आपल्या गरोदरपणाचे अनुभव सांगितले आहेत. विशेष म्हणजे करिनाने या पुस्तकाला तिचं तिसरं मूल म्हटलं आहे. 



करीनाने पुढे लिहिलं आहे की, ''बर्‍याच प्रकारे हे माझं तिसरं मूल आहे''. हे पुस्तक लिहिण्यापासून ते प्रकाशित करण्यात ज्यांनी तिला मदत केली त्याबद्दल करिनाने आभार मानले. हे देखील आपल्या सर्वांसमोर शेअर करताना मी चिंताग्रस्त आणि उत्साहित आहे. अनेक सेलिब्रिटींनी या पोस्टवर कमेंट करत करिनाचं कौतुक केलं आहे. करीनाची बहीण करिश्माने देखील हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंन्ट केली आहे. त्याचवेळी करीनाचे चाहते तिचं या पुस्तकाबद्दल अभिनंदन करत आहेत


अल्ट्रासाऊंडचा फोटो केला शेअर
पुस्तकाच्या घोषणेपूर्वी करीना कपूरने स्वत:चा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती हातात अल्ट्रासाऊंड पकडून दिसत आहे. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे की, मी काही रोमांचक गोष्टीवर काम करत आहे मात्र आपण जे विचार करीत आहात ते हे नाही. करीनाचा हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर चाहत्यांकडून बर्‍याच कमेंन्ट केल्या जात होत्या. काही चाहते विचारत होते की आपण तिसऱ्यांदा आई होणार आहात का?


काही महिन्यांपूर्वी करीनाने दुसर्‍या मुलाला जन्म दिला. फॅन्स करीनाच्या दुसर्‍या मुलाच्या झलकची आतुरतेने वाट पाहत आहेत. करिनाने तिच्या दुसऱ्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला मात्र या फोटोत त्या बाळाचा चेहरा दिसत नाहिये.