मुंबई : करीना कपूर खान तिसऱ्यांदा गरोदर असल्याची बातमी मंगळवारपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बातमीची सर्वत्र चर्चा आहे. पण शेवटी सत्य काय आहे? यावर आता करिनाने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर, तिचा लंडन व्हेकेशनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. ज्यामध्ये तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता आणि तो फोटो पाहून ती तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचं युजर्सना वाटत होतं. या फोटोतून जे काही समोर आलं, ते पाहून तिच्या गरोदरपणाची बातमी सर्वत्र पसरली. यावर अनेक मीम्सही बनवले गेले आणि लोकांनी तिचं अभिनंदनही केलं. पण आता करीना कपूरने तिच्या खास स्टाइलमध्ये या बातमीला  नकार दिला आहे.



तिने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'हा पास्ता आणि वाईन आहे मित्रांनो...शांत व्हा. मी गरोदर नाही..अरेरे. सैफ म्हणतो की या देशाच्या लोकसंख्येमध्ये त्याने आधीच खूप योगदान दिलं आहे. याचा आनंद घ्या….KKK' अशा प्रकारे, तिच्या मजेदार आणि खेळकर शैलीत, करीनाने स्पष्ट केलं की, ती गर्भवती नाही. करिनाची ही पोस्ट शेअर करताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली आहे.