सैफ अली खान आणि करिनामध्ये नेमकं काय बिनसलं? व्हिडिओ पाहून चाहत्यांना धक्का
सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी 2012 मध्ये धूमधडाक्यात लग्न केलं.
मुंबई : सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी 2012 मध्ये धूमधडाक्यात लग्न केलं. 2008 मध्ये त्यांचं अफेअर सुरू झालं आणि चार वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचं वचन एकमेकांना दिलं. आता त्यांच्या लग्नाला 9 वर्षे पुर्ण झाली आहेत. दोघांना दोन मुलं असून हे सुखी कुटुंब आपलं जीवन आनंदात व्यतीत करत आहेत. या दोघांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जरी आता व्हायरल होत असला तरी हा व्हिडिओ फार जुना आहे. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा हे दोघं एकमेकांना फक्त नावाने ओळखत होते. हा व्हिडिओ 2002 सालचा आहे ज्यामध्ये करीना एक पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर जाते. आणि या शोचं होस्टिंग सैफ अली खानने केलं होतं.
2002 मध्ये, झी सिने अवॉर्ड्समध्ये करीना कपूरची क्वीन ऑफ हार्ट्स म्हणून निवड करण्यात आली. हा शो सैफ अली खानने होस्ट केला होता. करिनाला पुरस्कार देण्यासाठी सैफने अक्षय खन्नाला स्टेजवर बोलावलं. त्यानंतर करीना कपूरच्या नावाची घोषणा झाली आणि करीनाने स्टेजवर पोहोचून पुरस्कार स्वीकारला.
या दरम्यान तिने अक्षय खन्ना आणि मंचावर उपस्थित असलेल्या इतर पाहुण्यांना मिठी मारली मात्र सैफकडे तिने पूर्णपणे दुर्लक्ष केलं. यानंतर ती विनर स्पिच देण्यासाठी मंचावर येते पण सैफला भेटत नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सैफ अली खान आणि करीना यांनी 2006 मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. दोघं ओंकारामध्ये एकत्र दिसले. 2006 नंतर दोघांनी टशन या चित्रपटात स्क्रीन शेअर केली आणि इथूनच त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली. करीनाला पाहून सैफ वेडा झाला असं म्हटलं जातं. त्यानंतर त्याने करिनाला प्रपोज केलं. करीना सुरुवातीला त्याला टाळत होती. पण नंतर तिलाही सैफ आवडू लागला आणि अखेर दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं.