Kareena Kapoor -Shahid Kapoor : दादा साहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड्समध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र, यावेळी करीना कपूर आणि शाहिद कपूरनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा अवॉर्ड शो मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी मुंबईत झाला. या अवॉर्ड शोमध्ये दोघांनी हजेरी लावली होती. कधी काळी एकमेकांना डेट करत असलेले लोकं जेव्हा समोरा समोर येतात. तेव्हा सगळ्यांना त्यांना एकत्र पाहण्याची इच्छा असते. मात्र, या दोघांमध्ये बोलणं झालं नाही. त्या दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेला  शाहिदचा हा व्हिडीओ फिल्मीग्याननं शेअर केला आहे. या व्हिडीओत शाहिद कपूर,  फिल्ममेकर राज आणि डीके यांच्यासोबत रेड कार्पेटवर असल्याचे दिसत आहे. शाहिद आणि फिल्ममेकर्सच्या हातातच ट्रॉफी असल्याचे पाहायला मिळते. तिचं ट्रॉफी घेऊन ते पापाराझींना पोज देण्यासाठी तयार होत असतानाच समोरून करीना जाताना दिसते. तिचा वजनदार असा लेहेंगा परिधान करून जाताना करीनानं शाहिदच्या शेजारी असलेल्या निर्मात्यांना हाय-हॅलो केलं मात्र, शाहिदकडे दुर्लक्ष केलं. तर दुसरीकडे शाहिद तिचा चेहरा पाहत राहिला आणि त्यानंतर त्यानं खाली तिच्या लेहेंग्याकडे पाहिले. आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


शाहिद आणि करीनाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'शाहिद बोलत असेल प्रेम कोणा दुसऱ्या कोणावर करत असेल पण आजही तितकीच सुंदर दिसते.' दुसरा नेटकरी म्हणाला, ज्या प्रकारे शाहिदकडे दुर्लक्ष केलं, तसंच इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करा.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'शाहिद आजही तरुण आहे आणि करीना म्हातारी झाली आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'जर हे दोघं कपल असते तर बॉलिवूडची बेस्ट जोडी झाले असते.'


दरम्यान, 'उडता पंजाब' या चित्रपटाचं प्रमोशन करत असताना शाहिद आणि करीनात असाच एक सीन झाला होता. तेव्हा त्यांना मीडियाला सांगितलं की 'ते एकत्र फोटो का काढत नाही. त्यांनी म्हटलं की जर त्यांनी एकत्र फोटो काढले तर त्यावरून एक वेगळा वाद सुरु करतील. जर मी आणि करीनानं सोबत फोटो काढले तर लोक त्याविषयीच लिहू लागतील. त्यानंतर फक्त त्याविषयी चर्चा सुरु होईल. आम्ही तिथे उडता पंजाबच्या प्रमोशनसाठी आलो होतो आणि त्याचं व्यवस्थित रिप्रेझेंटेशन व्हायला हवं अशी आमची इच्छा होती. त्यामुळे आम्ही अशा प्रकारे उभे होतो.'