मुंबई : तैमूरच्या लग्नानंतर करीना कपूर खान 'वीरे दी वेडिंग' या सिनेमांतून कमबॅक करतेय. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धम्माल करत आहे. या सिनेमांतून पुन्हा एकदा करीना कपूरने स्वतःला सिद्ध केलं आहे. सिनेमाघरात गर्दी ओढून आणण्यास करीना कपूर खरी ठरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वीरे दी वेडिंग'च्या यशानंतर करीनाने एका मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहे. अनेकांना असं वाटत होतं की मी लग्नानंतर काम करू नये, असे अनेकांचे म्हणणे होते असं करीना म्हणाली. एवढंच काय तर लग्नानंतर आणि तैमूरच्या जन्मानंतर मला सिनेमांच्या अनेक ऑफर आल्या. मात्र मी फक्त वर्षातून एकच सिनेमा करण्याचा निर्णय घेतला. आणि हे सगळं मी माझा 17 महिन्याचा मुलगा तैमूरसाठी करत आहे. तैमूर ही माझी जबाबदारी आहे. माझ्यासाठी माझा मुलगा, नवरा, माझं कुटूंब सर्वात पहिलं आहे त्यानंतर सिनेमा. 


करीना कपूर आणि सैफ अली खान एकाचवेळी सिनेमे करणार नाहीत. एवढा मोठा निर्णय फक्त तैमूरसाठी केला जात आहे. आता करीनाचा सिनेमा रिलीज झाला आहे तर सैफ आपल्या आगामी सिनेमाच्या शुटिंगसाठी सज्ज झाला आहे. नोव्हेंबरपर्यंत सैफची आगामी फिल्म तयार होईल तोपर्यंत करीना कोणताच सिनेमा स्वीकारणार नाही अशी डिल या दोघांमध्ये झाली आहे.