मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अलीकडेच, अभिनेत्री तिच्या 'जाने जान' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती ब्राइडल लूकमध्ये दिसत आहे. लोकं तिचा सुंदर वधूचा अवतार खूप पसंत करत आहेत आणि तिचा हा लूक खूप  व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बी-टाऊनची प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने तिच्या ब्रँड द हाउस ऑफ मसाबा अंतर्गत तिचे नवीन ब्राइडल कलेक्शन लॉन्च केलं आहे. तिचं नवीन कलेक्शन भारताच्या शाही वारसा आणि डिझाइनचे सुंदर मिश्रण आहे. तिच्या कलेक्शनच्या व्हिडिओची झलक इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर पाहता येईल. मसाबा गुप्ताने तिच्या पहिल्या मसाबा वधूसाठी करीना कपूर खानची निवड केली आहे, करिनावर हे सगळं कलेक्शन खूपच खुलून दिसत आहे. 


हाऊस ऑफ मसाबाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'तुम्हाला असा चेहरा फार क्वचितच सापडतो जो आकर्षक, सुंदर, संस्मरणीय असेल आणि तुम्ही जसे आहात तसं व्हायचं आहे.' या व्हिडिओवर चाहते खूप कमेंट्सचा वर्षाव करत आहेत आणि करिनाचे खूप कौतुकही करत आहेत.


लाल लेहेंग्याशिवाय अभिनेत्री पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या लेहेंग्यातही दिसली. तसंच, अभिनेत्रीने काळ्या-पांढर्या रंगाचे देखील सुंदर पोशाख परिधान केले होते. करीना या सगळ्या आउटफिट्समध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिला पाहून तिचे चाहते तिच्या पुन्हा एकदा प्रेमात पडतील यात काही शंका नाही.



मसाबा गुप्ता आणि करीना कपूर खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघंही अनेकदा पार्टी आणि इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात. मसाबा ही ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आहे. मसाबा वेस्टर्न आणि इंडो वेस्टर्न आउटफिट्सपासून साडी डिझाइन करण्यात एक्सपर्ट आहे. तिने डिझाईन केलेल्या कपड्यांमध्ये मोठे सेलिब्रिटी दिसत असतात. कपडे डिझाइन करण्यासोबतच मसाबा एक अभिनेत्री देखील आहे आणि तिच्या जीवनावर आधारित मसाबा मसाबा या सीरीजमध्ये ती दिसली आहे.