मुंबई : करिना कपूर जर एखाद्या इव्हेंटमध्ये गेली तर समजून घ्या की, त्या इव्हेंटमध्ये तिच आकर्षणाचं केंद्रबिंदू असेल. असेच काहीसे बघायला मिळाले ते सोहा अली खानच्या बुक लॉन्च इव्हेंटमध्ये.




इव्हेंट भलेही सोहाचा होता, पण सर्वांचं आकर्षण ठरली ती करिना. सैफ कुर्ता-पायजामा परिधान करून आला होता तर करिना लाल रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये हॉट दिसत होती. करिनाच्या या ड्रेसचं डिझाईन बिभु मोहपात्राने केलं होतं.