परफेक्ट फिगरमध्ये येण्यासाठी करीना कपूर खानची धडपड सुरु
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान एक फिटनेस फ्रिक आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान एक फिटनेस फ्रिक आहे. आणि हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ती नेहमीच तंदुरुस्त राहण्यावर विश्वास ठेवते हे कुणापासून लपलेलं नाही. करीना दररोज योगा करते. करीना कपूरने काही दिवसांपूर्वीच दुसर्या मुलाला जन्म दिला आणि त्यानंतर ती वजन कमी करण्यासाठी परिश्रम घेत आहे. करीना कपूर खान तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या वर्कआउट सेशन्सचे व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने डंबेल आणि व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्याचबरोबर करीना कपूरने तिच्या योग सत्राची झलक देखील सोशल मीडियावर दाखविली आहे.
करीना कपूर खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर योगा करतानाचा एक फोटो पोस्ट केला होता. पहिल्या फोटोमध्ये करीना एका पायावर बॅलन्स करताना दिसत आहे. तर दुसर्या फोटोमध्ये ती आपल्या शरीरावर पुढे झुकताना एका पायावर बॅलन्स करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करण्याबरोबरच कॅप्शनमध्ये तिने असं लिहिलं आहे की, 'माझी ओजी योगिनीसोबत जोरदार जबरदस्त बॅलन्सिंग करत आहे.'
करीना कपूर खान पुन्हा मेनटेन करण्यासाठी खूप परिश्रम घेत आहे. तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत करीनाने लिहिलं आहे की, 'हलचल'. करीना खरोखरच अशा सर्व आईंसाठी प्रेरणादायी आहे ज्यांना गर्भधारणेनंतर वजन कमी करायचं आहे.