करिनाने भाची समायराला दिला `हा` सल्ला
करिनाला करिश्माच्या मुलीची ही गोष्ट खटकते
मुंबई : अनेक बॉलिवूड कलाकारांसाठी त्यांच्या बहिणी-भावंडांची मुलं ही खूप खास असतात. अनेकदा हे सिनेकलाकार त्यांच्यासोबत फोटो शेअर करतात दिसतात. असंच काहीसं अभिनेत्री करिना कपूरबद्दल देखील आहे. करिनासाठी तिची भाची म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूरची मुलगी समायरा खूप खास आहे. तसं अनेकदा तिने आपल्या फोटोंमधून स्पष्ट केलंय.
करिना कितीही व्यस्त असली तरीही ती अनेकदा आपल्या बहिणीच्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते. तिच्या बिझी शेड्युलमधून समायरा आणि कियानला क्वालिटी टाइम दिला जातो.
करिनाने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, ते समायराबद्दल भरपूर सतर्क आहे. तिने भाची समायराबद्दल करिश्माला देखील सल्ले दिले आहे. सोशल मीडियाचा प्रभाव मुलांवर भरपूर होत असतो. त्यामुळे बेबोने खूप महत्वाचा सल्ला करिश्माला दिला आहे.
करिना म्हणाली की, मी कायम करिश्माला सांगत असते की, समायरा बराचकाळ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे तिची ही वेळ कमी करायला हवी. तसेच करिना म्हणाली की, समायरा सोशल मीडियावरील स्नॅपचॅट आणि इतर अॅप्स वापरत असते. समायरा तिच्या आधीच्या गोष्टी म्हणजे पुस्तकं वाचणे आणि इतर गोष्टी विसरत चालली आहे.
पुढे मुलाखतीत करिना म्हणाली की, माझ्या बहिणीला 14 वर्षांची मुलगी आहे. आणि ती तिचा बराचवेळ सोशल मीडियावर घालवते. त्यामुळे मी लोलोला सांगितलं आहे की, तिच्यावर लक्ष ठेवं. ती कुटुंबासोबत जास्त वेळ घालवत नाही. (हे पण वाचा : करिनाने सांगितली सैफची वाईट सवय)
अभिनेत्री करिना कपूर स्वतः सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नाही. तिची टीम तिच्याबाबतच्या गोष्ट शेअर करत असते. करिश्मा देखील सोशल मीडियाचा वापर करते. अनेकदा करिश्मा त्यांचे फॅमिली फोटो शेअर करताना दिसते.
नुकतंच या सगळ्यांना पतौडी येथे करिनाचा 39 वा वाढदिवस साजरा केला. तसेच या अगोदर करिश्मा तिच्या मुलांसह आणि करिना तैमूरसह लंडनमध्ये हॉलिडे साजरा करायला गेल्याचे फोटो आपण पाहिले आहेत.