करीना कपूर खानच्या दुसऱ्या मुलाचं नाव ठरलं, ज्योतिषांनी सांगितलं भविष्य
भविष्यात करीनाच्या मुलाचं वेगळेपण होणार अधिक अधोरेखित
मुंबई : करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या दुसऱ्या मुलाचं नामकरण झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या बाळाच्या नावाची वाट पाहत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून चाहते तैमूरच्या लहान भावाच्या नावाबद्दल चर्चा करत होते. दुसऱ्या नवाबचं नाव सोशल मीडियावर चर्चेत होते. (Kareena Kapoor Khan, Saif Ali Khan second son Meaning) करीना आणि सैफ यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव काय असेल ही उत्सुकता आता संपली आहे.
करीना आणि सैफने आपल्या मुलाचं नाव जाहिर केलं आहे. या कपलने तैमूरच्या जन्मानंतरची चूक पुन्हा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तैमूरच्या जन्मानंतर त्याच्या नावाची खूप चर्चा झाली. तसेच टीका देखील करण्यात आली.
यामुळे करीना आणि सैफ दुसऱ्या बाळाच्या पब्लिक अपीयरन्सवरून खूप सतर्क आहेत. म्हणून खूप काळानंतर त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव जाहीर केलं आहे. या दोघांनी दुसऱ्या मुलाचं नाव 'जेह' असं ठेवलं आहे. याची माहिती करीनाचे वडिल, ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी केली आहे. या नावाचा अर्थ अतिशय सकारात्मक आहे.
'जेह' चा अर्थ काय?
ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार 'जेह' हे एक पारसी नाव आहे. या नावाचा अर्थ 'येण' (to come). हे एक सकारात्मक आणि चांगल नाव आहे. या नावाचा अर्थ मुलाच्या जन्मानंतर कुटुंबात आणि जगात आनंदाच वातावरण असेल. 'जेह' नाव शुभ आणि सकारात्मकचं प्रतिक आहे.
'जेह' नावाचं महत्व
अंकशास्त्रानुसार, जेहचे एकूण नाव सात येते. ज्योतिषी म्हणतात की सहसा ज्यांची एकूण संख्या चार, सात आणि आठ येते, त्यांची नावे मोजली पाहिजेत. ते त्यांची शिफारस करत नाहीत. कारण ही संख्या सहसा असे सूचित करते की मूल अत्यंत आध्यात्मिक, सांसारिक भावनांपासून दूर असू शकते. तसेच अशीही शक्यता आहे की अशी मुले ही विवाहित जीवनापासून दूर राहणे पसंत करतात. त्यांना व्यवसायात रस नाही. असे लोक कदाचित जगापासून दूर असतील. ज्योतिषशास्त्रानुसार असे लोक संत होण्याची शक्यता आहे. हे लोक दान देण्यावर विश्वास ठेवतात.