Kareena Kapoor Khan on Taimur : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही UNICEF इंडियाची ब्रॅन्ड एम्बॅसिडर झाली आहे. त्याची घोषणा दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात झाली. त्यावेळी करीनानं तैमूर आणि जहांगीरच्या पेरेंटिगवर देखील वक्तव्य केलं. यावेळी करीनानं खुलासा केला की तैमूर नेहमीच तिच्या व्यग्र वेळापत्रकाची तक्रार करत असतो. करीनानं या कार्यक्रमात तिची मुलं तिला कसे समजून घेतात हे जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीनानं नुकत्याच घडलेल्या एका गोष्टीचं उदाहरण देत सांगितलं की "मला वाटतं की माझी मुलं फक्त त्यांच्या वडिलाच्या कामाला नाही तर आईच्या कामाला देखील समजून घेतात. ते या कामाचा आदर करतात. आज त्यांची सुट्टी होती आणि त्यांची इच्छा होती की मी घरी थांबायला हवं. पण मी त्यांना सांगितलं की मला कामावर जावं लागेल. तैमूर म्हणाला, 'तू नेहमी कामासाठी दिल्ली किंवा दुबईला जातेस. मला तुझ्यासोबत रहायचं आहे.' मी त्याला सांगितलं की काम देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि मी त्याला वचन दिलं की मी परत आल्यावर त्याला खूप वेळ देईन. जेणे करून त्याला वाटायला नको की मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते." 



करीना कपूर खाननं सांगितलं की 'ती आणि सैफ अली खान नेहमी आदरानं आणि प्रेमानं राहतात. कारण मुलं जे पाहतात तेच करतात. तिनं सांगितलं की ते आपण जे करतो किंवा आपला स्वभाव लक्षात ठेवतात आणि आपण एकमेकांशी कसं बोलतो हे बघतात. सैफ नेहमी मला बोलतो की आपण मुलांसमोर प्रेमानं बोलायला हवं, जेणे करून माली मुलं एकमेकांशी प्रेमानं वागतील. त्याचं म्हणणं असतं की मुलं आपल्याला पाहत आहेत आणि आपल्याकडून शिकतात. हाच एक प्रकार आहे ज्यातून तुम्ही मुलांना सगळ्यांचा आदर करणं शिकवतात.' 


हेही वाचा : ...तर 'हीरामंडी' मध्ये मल्लिका जानच्या भूमिकेत दिसल्या असत्या रेखा, पण असं का होऊ शकलं नाही?


चित्रपटसृष्टीतील करिअरविषयी बोलायचं झालं तर करीना कपूर खान ही 'द क्रू' या चित्रपटात दिसली होती. तिच्यासोबत क्रिती सेनन आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. आता लवकरच करीना ही रोहित शेट्टीच्या कॉप यूनिव्हर्सच्या आगामी चित्रपट सिंघममध्ये दिसणार आहे.