मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने तिचा मोठा मुलगा तैमूर अली खानचा एक गोंडस फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. करीना सध्या तिचे दोन मुलगे तैमूर आणि जहांगीर यांचे फोटो शेअर करत असते. जेहच्या जन्मापासून तैमूर करिनाचा मोठा मुलगा झाला आहे, म्हणून त्याने आपल्या मित्रांसोबत रोड ट्रिपला जाणं देखील सुरू केलं आहे. करीनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तैमूर त्याच्या मित्रांसोबत खूप मजा करताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच करीना कपूर खानने तैमूर अली खान आणि तिच्या मित्रांचे दोन फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत तैमूर त्याच्या मित्रांसोबत बागेत झोपलेला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत तैमूर त्याच्या गोंडस स्माईलने कॅमेराकडे बघत पोझ देत आहेत. हा फोटो पोस्ट करताना, बेबोने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'रोड ट्रिपसाठी तयार, नेहमीप्रमाणे छान वेळेसाठी थँक्यू, gallopsmumbai माझी आवडती जागा.'



याआधी करीनाने तिचा दुसरा मुलगा जहांगीर अली खानसोबत एक गोंडस फोटो शेअर केला आहे. लोक प्रेमाने जहांगीर अलीला जेह म्हणतात. जेहेला सहा महिने पूर्ण झाल्यावर बेबोने फोटो शेअर केले. फोटोत पाहिलं जाऊ शकतं की, करीना जहांगीरला तिच्या मांडीवर धरून त्याच्या डोक्यावर किस करत आहे. हे फोटो शेअर करताना तिने लिहिलं की, 'तुला नेहमी प्रेम, आनंद आणि धैर्य मिळावं ... माझ्या आयुष्याला 6 महिने पुर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा.' यासोबतच तिने आपल्या कॅप्शनमध्ये अनेक हार्ट इमोजीस देखील समाविष्ट केले आहेत.


करीना कपूर खान मालदीवच्या सुट्टीवरुन दोन दिवसांपूर्वी पती सैफ अली खान आणि दोन्ही मुलगे तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान यांच्यासोबत परतली. ती तिथे कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम स्पेन्ट करत आहेत. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे मालदीवच्या सुट्टीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.