मुंबई: लाडका आणि क्यूट तैमुर अली खान कायम सोशल मीडियावर चर्चेत असतो. बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खानने काही दिवसांपूर्वी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. जन्मापासूनच करिनाचा दुसरा मुलगा देखील चर्चेत आहे. डिलीवरीनंतर करिना पहिल्यांच एका पार्टीमध्ये स्पॉट झाली होती. यानंतर करिनाने छोट्या खानचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. करिना आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव काय ठेवणार याकडे, बेबोच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. कायम चर्चेत असणारा तैमुर पुन्हा एका चर्चेत आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता सोशल मीडियावर चर्चा आहे ती, तैमुरच्या कुकिंगची. तैमुर या फोटोमध्ये हातात ट्रे पकडून कुकीज बेक करायला जात असल्याचं दिसत आहे. या कुकिज खुप खास आहेत. कारण या कुकीजमध्ये त्याने आई करिना, बाबा सैफ, लहान भाऊ आणि तैमुरने स्वत:चा आकार दिला आहे.



तैमुरचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोत तैमुरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. हातात ट्रे पकडून मासूम अंदाजात तैमुर कॅमेरामध्ये पाहत आहे. करिनाने तैमुरचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तैमुरने कुकीज बनवल्यानंतर करीना तैमुरवर खुश झालेली दिसत आहे


हा फोटो शेअर करत करिनाने ''माझा लाडका एका फ्रेममध्ये आहे. खूप छान वाटत आहे. शेफ टिम आणि फेवरेट बॉय'' अशा आशयाचं कॅप्शन देखील करिनाने या पोस्टला दिले आहे. करिनाच्या या फोटोवर सोशल मीडियावर फॅन्सबरोबरच सेलिब्रिटीदेखील कमेंन्ट करत आहेत. डिलीवरीनंतर करिनाच्या वजनात वाढ झाली आहे. यामुळे ती कर्म्फटेबल आणि लूज कपड्यात स्पॉट होत असते.