मुंबई: गणेशोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. सेलिब्रिटी आणि कलाकरांच्या घरीही थाटामाटत बाप्पाचं आगमन झालं आहे. यामध्ये मराठी ते बॉलिवूडमधील स्टार्सपर्यंत सेलिब्रिटींच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाला आहे. यंदा अनेक कालाकारांन बाप्पाचं चित्र किंवा क्ले पासून गणरायाची मूर्ती तयार करून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छोटा नवाब अर्थात तैमूरने गणपती तयार केला आहे. सैफ आणि करिनाने आपल्या घरात यंदा बाप्पा विराजमान झाले आहेत. यावर्षी तैमूरनं छोटी गणपतीची मूर्ती तयार केली आहे. त्याचा फोटो करिनाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना करिनाने खास कॅप्शन दिल आहे.


'माझ्या आयुष्यातील मित्रांसोबत गणेश चतुर्थी साजरी करत आहे. टिम्टीमने मातीच्या मदतीने लहान आणि गोंडस गणपती देखील बनवले. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.' असं कॅप्शन करिनाने दिलं आहे. तैमुरने क्लेचा गणपती बाप्पा तयार केला आहे. दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर एका महिन्यातच पुन्हा करिनानं आपल्या फिटनेसवर काम केलं. 



आमिर खानसोबत करिना कपूर आता 'लाल सिंह चड्ढा' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सैफ अली खान हॉरर आणि कॉमेडी सिनेमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तैमुरचा हा गणपती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.