मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan)आणि आमिर खान (Aamir Khan) लवकरच 'लालसिंग चढ्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. पडद्यावर तसेच, रिअल लाईफमध्ये दोघांची खूप चांगली केमिस्ट्री आहे. रविवारी करीना कपूर खानने आमिर खानच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त आपल्या चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीनाकडून सरप्राइज


करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ने आपल्या लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha)सिनेमाचा को-स्टार आमिर खान (Aamir Khan) ला वेगळ्याच अंदाजात त्याच्या 56व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छां बरोबरच.  सिनेमातला मिस्टर परफेक्शनिस्टचा नवीन लूक शेअर केला आहे. हा लूक सोशल मीडियावर अफाट वायरल होत आहे.


करीनाने या फोटोला कॅप्शन लिहलं की  'वाढदिवसाच्या शुभेच्छा, मेरे लाल (happy birthday my laal)तुझ्यासारखा कोणी दुसरा नाही,  तुझ्या ऍक्टींगची जादू पाहिल्यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया असतील याची मी वाट पाहत आहे.


कसा आहे आमिरचा लूक
या फोटोमध्ये आमिरने पगड़ी घातली आहे आणि लांब झुपकेदार दाढी वाढवली आहे. तो खुर्चीत बसला आहे, त्याला कोणत्यातरी गोष्टीचा फार आनंद झाला असावा असा तो मजेशीर पणे हसत आहे.



९ वर्षांनंतर करीना-आमिर एकत्र
लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha)या सिनेमामध्ये करीना आणि आमिर 9 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. आमिर आणि करीनाने '3 इडियट्स' आणि 'तालाश' नंतर मोठ्या पडद्यावर आता इंटरी केली आहे.


या सिनेमाचा रीमेक
'लाल सिंह चड्ढा' हॉलीवुड सिनेमा 'फॉरेस्ट गंप' चा हिंदी रीमेक आहे. हा सिनेमा नाताळमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.