सैफ अली खान समोरचं केलं करिनाने शाहिद कपूरला किस; फोटो समोर
करिना आणि शाहिद संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या या दोघांचा एक किसींग फोटो व्हायरल होत आहे.
मुंबई : अभिनेता शाहिद कपूर (Shahid kapoor) आणि अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena kapoor khan) हे बॉलिवूडचं एकेकाळी फेव्हरेट कपल होतं. दोघांच्या अफेअरच्या चर्चा इंडस्ट्रीमध्ये होत होती. जब वी मेट सिनेमादरम्यान या दोघांचं ब्रेकअप झालं. 2007 मध्ये जब वी मेट (Jab we met) हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. दोघांनी या सिनेमात प्रेक्षकांचं मन जिंकलं. पण ब्रेकअपच्या बातमीनंतर अनेक चाहत्यांना धक्का बसला होता.
2004 मध्ये त्यांचा फिदा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि तेव्हापासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर दोघेही आपापल्या वेगवेगळ्या चित्रपटात व्यस्त झाले. करीना एकीकडे टशन चित्रपटात काम करत असताना दुसरीकडे शाहिद किस्मत कनेक्शन या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. करीनाचा सैफवर सिक्रेट क्रश होताच, शाहिदचे नाव तिची सह-अभिनेत्री विद्या बालनसोबतही जोडले गेले. पण आज आम्ही तुम्हाला शाहिद करिनाचा असा किस्सा सांगणार आहोत जो ऐकून तुम्हाही आश्चर्यचकित व्हाल.
करीना कपूरचं एकेकाळी अभिनेता शाहिद कपूरवर खूप प्रेम होतं. 2004 मध्ये आलेल्या फिदा चित्रपटानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या येऊ लागल्या. त्यांच्यातली जवळीक इतकी वाढली की, लोकांना वाटू लागलं होतं की, दोघंही आयुष्य एकत्र घालवणार आहेत, पण असं होऊ शकलं नाही.
एकदा करीना कपूरने सैफ अली खानसमोर शाहिद कपूरला किस केलं होतं. ओमकारा या चित्रपटात करीना कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी करिनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. तिला हा पुरस्कार देणारा व्यक्ती दुसरा कोणी नसून तिचा पती सैफ अली खान होता. करीना कपूर स्टेजवर एन्ट्री मारण्याआधी तिने त्यावेळी शाहिद कपूरला किस केलं.
शाहिद कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री करीना कपूर 2008 मध्ये टशन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफ अली खानच्या प्रेमात पडली. करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी एकमेकांना ४ वर्षे डेट केलं होतं, त्यानंतरच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. करीना कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर एकीकडे शाहिद कपूर आपल्या करिअरमध्ये व्यस्त झाला, तर दुसरीकडे करीनाने सैफ अली खानला डेट करायला सुरुवात केली. करीना कपूर ही सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे. तर सैफ अली खान आणि करीना कपूर हे दोन मुलांचे पालक आहेत.