Malaika Arora 49th Birthday Party: अभिनेत्री मलायका अरोराच्या वाढदिवसाच्या पार्टीला बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. या पार्टीला करीना कपूर, करिश्मा कपूर, अमृता अरोरा, सीमा सचदेव यांसारखे अनेक कलाकार पोहोचले होते. मलायका अरोरा आज 49 वर्षांची झाली आहे. पण तिचा फिटनेस पाहून कोणाला ही तिच्या वयाच्या अंदाज लावता येणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये मलायकाने बर्थ डे पार्टी ठेवली होती. ज्यामध्ये करीना कपूर, करिश्मा कपूर, सैफ अली खान, सोफी चौधरी, भावना पांडे, मनीष मल्होत्रा, गुरु रंधावा आणि अर्जुन कपूर यांसारखे कलाकार सहभागी झाले होते. यावेळी मलायका अरोराने पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला होता.



करीना कपूर ब्लॅक ब्रालेट आणि जीन्स परिधान करून आली होती. त्यामुळे तिचा ड्रेस चांगलाच चर्चेत राहिला. ब्रालेटवर तिने काळ्या रंगाचा ब्लेझरही घातला होता. करिश्मा कपूरने ब्लॅक अँड व्हाइट ड्रेस परिधान केला होता. करीना कपूरचा हा लूक पाहून युजर्सने त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.



बॉलिवूड कलाकारांनी मलायका अरोराला तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.


अर्जुन कपूरची पोस्ट शेअर करत सोनम कपूरने लिहिले, 'हॅपी हॅपी बर्थडे डार्लिंग. तू सुंदर आत्मा आहेस. माझे सर्व प्रेम.' दिया मिर्झानेही मलायका अरोराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्याशिवाय रिया कपूर, सोफी चौधरी यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. अर्जुन कपूरनेही त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले की, 'माझ्या येनचे यिन, हॅपी बर्थडे बेबी, तुझ्यासारखे राहा, आनंदी राहा, माझे राहा.' करीना कपूर करिश्मा कपूरनेही मलायका अरोराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.