करीनाचा लूक बदलला, १६ किलो वजन केलं कमी
बॉलिवूडची बेबो ही तिच्या सौंदर्यासह फिटनेससाठी देखील जाणली जाते. सध्या करीना योगा आणि जीमवर खूप लक्ष देते आहे. प्रेग्नेंट असतांना तिचं वजन वाढलं होतं. पण करीनाने पुन्हा एकदा फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलं आहे.
मुंबई : बॉलिवूडची बेबो ही तिच्या सौंदर्यासह फिटनेससाठी देखील जाणली जाते. सध्या करीना योगा आणि जीमवर खूप लक्ष देते आहे. प्रेग्नेंट असतांना तिचं वजन वाढलं होतं. पण करीनाने पुन्हा एकदा फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलं आहे.
करीनाने तब्बल १६ किलो वजन कमी केलं आहे. गेल्या ३ महिन्यामध्ये तिने आपलं वजन कमी केलं आहे. जब वी मेट सिनेमामध्ये करीनाची जी फिटनेस होती तिच तिने पुन्हा एकदा कायम केली आहे. ती न चुकता डायट फॉलो करते आहे. आता तिचं एकूण १८ किलो वजन कमी झालं आहे. तिला तिच्या आगामी सिनेमासाठी शुटींग सुरु होण्याआधी १९ किलो वजन कमी करायचं आहे. विरे दी वेडिंग हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.