मुंबई : चाहत्यांच्या मनात कायम असणारी अभिनेत्री करीना कपूर खान आज दोन मुलांची आई आहे. करीना प्रेग्नेंसीमध्ये देखील काम करत होती.  एवढंच नाही तर दोन्ही प्रेग्नेंसी दरम्यानचे तिचे फोटो देखील तुफान चर्चेत आले. दोन मुलांची आई झाल्यानंतर करीनाचं वजन देखील वाढलं होतं. पण आता दुसऱ्या प्रेग्नेंसीनंतर करीनाचं  बॉडी ट्रांसफॉर्मेशन सर्वांना थक्क करणारं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द करीनाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे करीना कपूर... तिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 



कामय चर्चेत राहणारी करीना सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. करीना कपूर असल्यामुळे तिच्या  चाहत्यांची संख्या तर मोठी असेलचं.. 


त्यामुळे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असते. एवढंच नाही तर करीना तिच्या दोन मुलांसोबत देखील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.