44 व्या वर्षीही करीना बोटॉक्स, सर्जरीपासून दूर; सैफचं नाव पुढे करत सांगितलं सिक्रेट...
Kareena Kapoor on Botox Or Cosmetic Surgery : करीनाच्या या सौंदर्यामागचं कारण काय? पती, सैफ अली खानचं नाव घेत काय म्हणाली बी टाऊनची बेबो? पाहा...
Kareena Kapoor on Botox Or Cosmetic Surgery : वय वाढू लागलं की शरीरात तसे बदल जाणवू लागतात. काही बदल तर चेहऱ्यावरही दिसून येतात. अनेकजण मग, वाढत्या वयाची चिन्हं लपवण्यासाठी म्हणून बोटॉक्स आणि प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतात. फक्त महिलाच नव्हे, तर पुरुषही यात आलेच. अधिक सुंदर दिसण्यासाठी किंबहुना सुंदरच राहण्यासाठीचा हा अट्टहास मागील काही वर्षांमध्ये वाढला आहे. सेलिब्रिटींच्या वर्तुळातही अशी अनेक नावं आहेत ज्यांनी बोटॉक्स ट्रीटमेंट केली असून, खुलेपणानं त्याचा स्वीकारही केला आहे.
बी टाऊनची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान मात्र या सर्वच सेलिब्रिटींना अपवाद ठरत आहे. कारण, वाढतं वय आपण लपवत नसून, जसे आहोत तसेच दिसू इच्छितो असं करीनानं नुकतंच एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं. गेल्या काही काळापासून करीना तिच्या वयाच्याच अनुषंगानं भूमिका साकारताना दिसत आहे, मग तो तिचा 'जाने जान' किंवा आगामी 'द बकिंघम मर्डर्स' हा चित्रपट असो. एकाच धाटणीच्या रोमँटिक भूमिकांना शह देत ती आता थोड्या वेगळ्या भूमिकांना पसंती देत आहे आणि तिची ही निवड चुकतही नाहीय असं चित्रपट विश्लेषकांचं मत.
'हार्पर्स बाजार'ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वाढत्या वयावर भाष्य केलं. आपण अजिबातच वाढतं वय लपवून कमी वयाचं दिसण्यासाठीचे प्रयत्न करत नाहीये असं तिनं स्पष्ट सांगितलं. इथून पुढंही बोटॉक्स (Botox) किंवा प्लास्टिक सर्जरी किंवा इतर कोणत्याही प्रकारची सर्जरी करण्याचा विचार नसल्याचंही करीनानं सांगितलं. आपण जसे आहोत अगदी तसेच पती सैफला आवडतो आणि आकर्षक वाटतो असंही तिनं सांगितलं. करीनानं सौंदर्याची तिची परिभाषा मांडताना सैफचं घेतलेलं नाव पाहता त्याचं तिच्यावर असणारं प्रेम हेच या अभिनेत्रीच्या सौंदर्याचं सिक्रेट आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.
हेसुद्धा वाचा : अंत्यदर्शनात कायम गॉगल आणि पांढरे कपडे का घालतात बॉलिवूड सेलिब्रिटी?
सेल्प केअरविषयी करीना ठामपणे काय म्हणते?
करीनाच्या मते तिला कायमच कौशल्य आणि कलेप्रती असणाऱ्या समर्पणाच्या बळावर काम मिळत गेलं. 'मी स्वत:ची काळजी घेतली, सुदृढ राहिले आणि स्वत:च्या उत्तमोत्तम गोष्टींवर लक्ष दिलं. इथं स्वत:ची काळजी घेणं म्हणजे स्वत:ला वेळ देणं. मग ते मित्रमैत्रीणींसमवेत चांगला वेळ व्यतीत करणं असो किंवा सैफसोबत जेवण बनवणं असो, अगदी व्यायामाचा आनंद घेणं असो. हेतू एकच आहे तो म्हणजे स्वत:ला अंतर्मनातून चांगलं वाटून घेणं. मग ते व्यायाम करून असो किंवा कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत करून असो', असं करीना म्हणाली. स्वत:ची काळजी घेण्याविषयीची तिची ही मतं अनेकांनाच पटली.