अंत्यदर्शनात कायम गॉगल आणि पांढरे कपडे का घालतात बॉलिवूड सेलिब्रिटी?

Malaika Arora Father Death : मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याशी झुंजणाऱ्या अनिल मेहता यांनी आयुष्य संपवत सर्वांनाच धक्का दिला. ज्यानंतर अनेक कलाकारांनी मलायकाच्या आईचं घर गाठलं. 

Sep 12, 2024, 12:43 PM IST

Malaika Arora Father Death : अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांच्या निधनाचं वृत्त मिळताच संपूर्ण कलाविश्वाला हादरा बसला.

1/7

मलायका अरोरा

did you know Why do celebs wear sunglasses and white at funeral

Malaika Arora Father Death : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांचे वडील अनिल मेहता यांनी राहत्या घराच्या बाल्कनीतून उडी मारत आयुष्य संपवलं. कलाविश्वासाठी हे हादरा देणारं वृत्त होतं. मलायका आणि तिच्या कुटुंबालाही यामुळं धक्का बसला आणि त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी मित्रमंडळींनी अभिनेत्रीच्या घरची वाट धरली. 

2/7

एका ट्रेंडची चर्चा

did you know Why do celebs wear sunglasses and white at funeral

इथं मलायकाच्या वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची रांग लागत असतानाच तिथं, एका ट्रेंडचीही चर्चा सुरू झाली. हा ट्रेंड म्हणजे अंत्यदर्शनासाठी जाणाऱ्या सेलिब्रिटींच्या स्टाईल स्टेटमेंटचा.   

3/7

अंत्ययात्रा

did you know Why do celebs wear sunglasses and white at funeral

जवळपास सर्वच सेलिब्रिटी अंत्ययात्रा किंवा अंत्यदर्शनासाठी पोहोचतात तेव्हा ते गॉगल घालूनच असतात. यावेळी पांढऱ्या कपड्यांनाच या मंडळींनी प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळलं. पण, हे असं का? 'कोरा' वर या प्रश्नातंही उत्तर सापडलं आहे. 

4/7

अनेक कारणं

did you know Why do celebs wear sunglasses and white at funeral

सेलिब्रिटी अंत्यदर्शनावेळी गॉगलचा वापर करतात, यामागे अनेक कारणं असतात असं म्हटलं जातं. त्यातलं एक कारण म्हणजे गोपनीयता. एखाद्या दु:खाच्या प्रसंगी सेलिब्रिटी विनाकारण कोणाचंही लक्ष वेधू इच्छत नाहीत, त्यामुळं ते गॉगलचा वापर करतात. 

5/7

हताश भाव

did you know Why do celebs wear sunglasses and white at funeral

अंत्यदर्शन आणि तत्सम कार्यक्रम अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळं आपल्या चेहऱ्यावर असणारे हताश भाव सेलिब्रिटी जाणीवपूर्वक लपवू पाहतात आणि याच कारणास्तव ते मेकअपचा वापर करतात.   

6/7

उगाचची प्रसिद्धी

did you know Why do celebs wear sunglasses and white at funeral

काही सेलिब्रिटी अशा ठिकाणी हजेरी लावताना उगाचच्या प्रसिद्धीपासून स्वत:ला दूर ठेवू इच्छितात. त्यामुळं कोणालाही ओळखता येणार नाही, किंवा छायाचित्रकारांचं लक्ष वेधलं जाणार नाही अशा रितीनं ते गॉगल, मास्क लावून अशा स्थळी पोहोचून तिथून निघून जातात.   

7/7

पांढरे कपडे

did you know Why do celebs wear sunglasses and white at funeral

राहिला प्रश्न सेलिब्रिटींच्या पेहरावाचा, तर बहुतांश मंडळी पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या कपड्यांना प्राधान्य देतात. यामध्ये पांढरे कपडे घालणाऱ्यांचा आकडा तुलनेनं जास्त असतो. पण, असं का? दु:खाच्या प्रसंगी पांढऱ्या रंगाचे कपडे घालून संकटांचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबाप्रती सहानुभूती दर्शवली जाते. याच कारणानं पांढऱ्या रंगांच्या कपड्यांना पसंती दिली जाते. स्वर्गवासी व्यक्तीप्रती आदराची भावना दर्शवण्यासाठीसुद्धा पांढरे कपडे घातले जातात.