मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर तिच्या प्रेग्नेंसी बायबल नावाच्या पुस्तकाच्या प्रकाशनची आतुरतेने वाट पाहत आहे. अभिनेत्रीने तिचा गर्भधारणेचा प्रवास तैमूर  अली खान आणि जेह या मुलांसोबत केला आहे. नुकताच तिने तिचा दोन्ही मुलांसोबतचा फोटो कोलाज शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डाव्या बाजूच्या फोटोत करिनाने तैमूरचा बालपणीचा फोटो शेअऱ केला आहे.तर उजव्या बाजूच्या फोटोत तिने जेहला कुशीत घेतल्याचं दिसून येत आहे. 


 



करिना कपूरने मुलांसोबतचा फोटो शेअर करताच चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.  प्रेग्नेंसीवरील पुस्तक लिहिणं दोन्ही मुलांशिवाय अशक्य  होत ,असं बेबोने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.


करीना कपूरने सैफ अली खानचा दुसरा मुलगा जेहला फेब्रुवारीमध्ये जन्म दिला. अभिनेत्रीने दोघांसोबतचा गोड क्षण शेअर केला आहे.