मुंबई : बॉलिवूड अभिनेता करीना कपूरने फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या मुलाला जन्म दिला. करीना गरोदरपणात देखील काम करत होती. बाळाला जन्म दिल्यानंतर करीनाने पुन्हा एकदा कामाला सुरूवात केली आहे. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा धोका वाढत असताना प्रत्येकजण काळजी घेत असतात. अशा परिस्थितीत करीना देखील घाबरलेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीना मंगळवारी एका ठिकाणी स्पॉट झाली. या दरम्यान करीनाने मास्क काढण्यास नकार दिला. पापाराजी समोर तिला पोझ द्यायची होती. पण कोरोना काळात ही एक रिस्क होती. म्हणून तीने पापाराजीला एक अट घातली. 


करीनाने पोझ देण्यासाठी आपण मास्क काढेन पण तुम्हाला माझी एक अट पाळावी लागेल. जर तुम्ही माझ्यापासून लांब राहाल तरच मी मास्क काढेन आणि पोझ देते. पापाराझीने करीनाची ही अट मान्य केली. 



करीना बाहेर दिसली तेव्हा पापाराझीने तिला चारहीबाजूंनी घेरलं. त्यानंतर त्यांनी फोटो क्लिक करायला सुरूवात केली. या दरम्यान करीना पापाराझी पासून लांब झाली. तिने पोझ द्यायला सुरूवात केली मात्र मास्क काढला नाही. त्यावेळी तिने पापाराजीने एक अट दिली. तिने म्हटलं तुम्ही आपल्यात अंतर ठेवलंत तर मी मास्क वापरेन. पापाराजीने करीनाची गोष्ट ऐकली आणि तिने मास्क काढून पोझ दिल्या. 


शूटिंगच्या सेटवरील काही फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. यामध्ये करीना पूर्णपणे फिट दिसत आहे. करीनाने दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर 20 किलो वजन कमी केलं आहे. 21 फेब्रुवारी रोजी तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. यानंतर करीना 1 महिन्यानंतर कामावर परतली आहे. शुटिंगच्या सेटवरील करीनाचा नवा लूक चाहत्यांना फार आवडला आहे.