Kareena Kapoor's Son Jeh : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचे लाखो चाहते आहेत. करीना जिथे जाईल तिथे तिचे चाहते आणि पापाराझी हे तिचे फोटो काढताना दिसतात. या दरम्यान जर करीनाची मुलं तिच्यासोबत असतील तर पापाराझी त्यांना आवाज देत त्यांचे फोटो काढताना दिसतात. सध्या करीनाचा तिच्या मुलांसोबतचा घरातून बाहेर पडलेली असताना पापाराझींना पाहताच तिचा धाकटा मुलगा जेह संतापला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीना, तैमुर आणि जेहचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर बॉलिवूजस्ट्रीटनॅपनं शेअर केला आहे. या व्हिडीओत करीना, तैमूर आणि जेह हे त्यांच्या बिल्डिंगमधून बाहेर आल्याचे दिसते. जेहला पाहताचा पापाराझी त्याला चिडवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हे लक्षात येताच जेह मागे फिरतो आणि त्या पापाराझीवर संतापतो. तो ओरडून पापाराझीला म्हणतो की ए, डोन्ट मेक नॉईस. जेहचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

जेहचा हा अंदाज पाहून सोशल मीडियावर नेटकरी खूप काही बोलत आहेत. एक नेटकरी म्हणाला, करीना कधीच तिच्या मुलांना काही बोलत नाही. तर काही नेटकरी जेहची स्तुती करत आहेत की चांगली गोष्ट आहे की मुलं स्वत: साठी भांडतात. त्याला जे नाही आवडतं त्यासाठी स्वत: चं स्टॅन्ड घेतो. तर काही नेटकऱ्यांनी म्हटलं की अशा प्रकारे चिडवणं योग्य नाही. काही नेटकरी म्हणत आहेत की दुसऱ्या मुलातच इतकी एनर्जी असते. दुसरा नेटकरी म्हणाला, हे दोघं मुलं कायम चिडूनच का असतात. तिसरा नेटकरी म्हणालास जेह नेहमीच चिडलेला असतो, मला हे गोंडस बाळ खूप आवडतं. आणखी एक नेटकरी म्हणाला, याला पाहिल्यावर जया बच्चनची आठवण येते. 


करीनानं एका मुलाखतीत तिच्या दोन्ही मुलांना घेऊन अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. करीनानं म्हटलं की 'जेह' हा जेवताना खूप हायपर होतो आणि केसांपासून पायापर्यंत सगळं काही खराब करतो. तैमूरविषयी बोलताना त्यानं म्हटलं की तो कधीच एका ठिकाणी शांत बसत नाही. करीनानं सांगितलं की तैमूर दिवसभर पळत राहतो. झाडांवर चढतो. 


हेही वाचा : सलमान म्हातारा झाला तरी 'बिग बॉस' काय सोडणार नाही! प्रोमोत दिसले 3 अवतार; फॅन्स म्हणाले...


तैमूर आणि जेहच्या जन्माविषयी बोलायचे झाले तर तैमूरचा जन्म 20 डिसेंबर 2016 मध्ये झाला. तर जेहचा जन्म 21 फेब्रुवारी 2021 ला झाला. जेहच्यावेळी तिच्या प्रेग्नंसीची माहिती करीला करीना 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटासाठी शूटिंग करत असताना कळलं.