Bigg Boss Promo Video : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानन सुत्रसंचालन करत असलेला 'बिग बॉस 18' हा शो लवकर प्रीमियर होणार आहे. रविवारी म्हणजे उद्या 6 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जेव्हा पासून या शोची घोषणा करण्यात आली आहे तेव्हा पासून प्रेक्षक आतुरतेनं आणि उत्साहानं या शोची प्रतीक्षा करत आहेत. या शोचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात सलमान खानचा एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. त्याला लूक पाहून सगळे चांगलेच उत्सुक झाले आहेत.
या व्हिडीओमध्ये सलमान खानचा सध्याचा जो लूक आहे त्याशिवाय तो आधी कसा दिसायचा त्याचा आणि भविष्यात तो कसा दिसणार याचा लूक पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत तरुणपणातील सलमान खान आहे आणि काही वर्षांनंतरचा सलमान दिसत आहे. हा प्रोमो कलर्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं आहे की सलमान खान देखील या चक्रव्ह्यूमधून वाचू शकला नाही, तर स्पर्धकांची काय अवस्था होणार? तर सलमानचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
हा प्रोमो पाहत नेटकरी कमेंट म्हणाला, काय भारी प्रोमो आहे देवा, सलमानला बिग बॉसमध्ये पाहण्यासाठी किती प्रतीक्षा केली. दुसरा नेटकरी म्हणाला, कसलं भारी एडिटिंग केलंय. तिसरा नेटकरी म्हणाला, बिग बॉस 38 लूक मला आवडला. आणखी एक नेटकरी म्हणाला, आता पाहायला मज्जा येणार. दुसरा नेटकरी म्हणाला, भविष्यात सलमान खानचा लूक चांगला दिसतोय. सलमानचं भविष्य अर्थात एआय व्हर्जनचा वयस्कर सलमान खान दिसतो.
हेही वाचा : एकीकडे 'जिगरा'चं प्रमोशन दुसरीकडे अॅलन वॉकरचा शो! आलियाचं 'एक तीर से दो शिकार'
सगळ्यात आधीचं व्हर्जन पाहतो आणि बोलतो की सलमान आता कुठे आहे? यावर सलमान खान म्हणाला की कन्फेशन रुममध्ये आहे. मग तरुणपणातील सलमान खान म्हणतो की आता कोणतं कन्फेशन देणार, आता काय केलं तू. मग सलमान खान म्हणाला की थांब यार ना मी काही केलं ना तू काही केलं होतं. मला नाही माहित की माझं भूतकाळ पाहणं इतकं वाईट असेल.
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.