मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खानचा लाडका तैमूर अली खान दररोज चर्चेत असतो. चाहत्यांना त्याचे फोटो आणि व्हिडिओ पाहायला फार आवडतात. आता तैमूर अली खानचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तैमूर त्याची आई करीना कपूर आणि लहान भाऊ जेहसोबत दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दरम्यान तैमूर अली खान तिथे उपस्थित असलेल्या कॅमेरामनवर चिडतो. त्याचा हा व्हिडिओ खूप पाहिला जात आहे आणि त्याचवेळी सोशल मीडिया नेटकरी त्याच्या या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.



तैमूर अली खानचा हा व्हिडिओ फोटोग्राफरकडून इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यात दिसत आहे की करीना कपूर आपल्या मुलांसह गेटच्या बाहेर येताच, कॅमेरामन तिला फोटोची विनंती करतो. पण नंतर तैमूर अली खान कॅमेरामनवर रागावतो. तैमूर व्हिडिओमध्ये रागात दिसत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.