मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या नात्याच्या चर्चा सतत वाऱ्यासारख्या पसरत असतात. मागील एक वर्षांपासून हे प्रेमी युगूल एकमेकांना डेट करत आहे. ही जोडी नेहमी अनेक ठिकाणी एकत्र दिसते. त्याचप्रमाणे आलिया-रणबीर यांच्या लग्नाच्या चर्चा देखील चांगल्याच रंगताना दिसत आहेत. त्यांच्या लग्नाची उत्सुकता समस्त कपूर आणि भट्ट कुटुंबाला लागून आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

liaa08 is this generation’s best artist KareenaKapoorKhan.#JioMAMIMovieMelawithStar #JioMAMIwithStar2019 pic.twitter.com/h2B9qb3pSu



रविवारी रणबीरची बहिण अभिनेत्री करिना कपूर खान आणि आलिया भट्ट 'जिओ मामी मुव्ही मेला विथ स्टार्स २०१९' शोमध्ये उपस्थित होत्या. शोमध्ये तिला आलिया-रणबीरच्या नात्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. करिना, आलियाला तिची वहिनी बनवण्यसाठी फारच उत्सुक असल्याचे या शोमध्ये दिसून आले. 


दिग्दर्शक करण जोहर, करिना आणि आलिया यांच्यात प्रश्न उत्तरांचा खेळ चांगलाच रंगला होता. 'तुला कधी वाटलं होतं की तू करिना कपूरची वहिणी होशील?' असा प्रश्न करणने आलियाला विचारला. तेव्हा आनंदाच्या भरात करिनाने मी सर्वात भाग्यशाली मुलगी आहे की, मला आलिया वहिनी म्हणून लाभली. असं म्हटली. 


जेव्हा आलिया-रणबीरचं लग्न होईल तेव्हा मी आणि करिना आरर्तीचं ताट घेवून उभं राहू. असं वक्तव्य करणने यावेळेस केलं. आलिया भट्ट, करिनाची खूप मोठी चाहती आहे. तर रणबीर आणि आलिया ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ते पहिल्यांदाचं एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.