Kareena Kapoor Wants To Show Taimur Shahid Kapoor This Movie: अभिनेत्री करिना कपूरने तिची मुलं तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान या दोघांनी माझे चित्रपट पाहिले नाहीत असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे करिनाने तिला तिच्या मुलांना कोणता चित्रपट दाखवायला आवडेल याबद्दल भाष्य केलं आहे. पीव्हीआरकडून सध्या 25 व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त फिल्म फेस्टीव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. याचवेळेस मुलांना तुझा कोणता चित्रपट दाखवायला आवडेल यावर करिना व्यक्त झाली आहे.


'ओंमकारा' नाही तर शाहिदचा हा चित्रपट दाखवणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पीव्हीआर'च्या फिल्म फेस्टीवलच्या उद्घाटन समारंभाच्या वेळीस तिला तुझ्या मुलांना तुझा चित्रपट दाखवायचा असेल तर तू कोणता चित्रपट दाखवशील? या प्रश्नावर करिनाने थेट उत्तर दिलं. "मला वाटतं मी तर हे सर्वांना विचारलं तर ते नक्कीच 'जब वी मेट' म्हणतील. 'ओंमकारा' चित्रपट त्यांना धक्का देणारा ठरेल कारण त्यांचे वडील त्यात आहे. त्यामुळे मी 'जब वी मेट'ची निवड करेन. त्यांनी अजून माझे चित्रपट पाहण्यास सुरुवात केलेली नाही. त्यामुळे या चित्रपटापासून सुरुवात करता येईल," असं करिनाने सांगितलं.


करिना अभिनेत्री तर सैफ अली खान व्हिलन


'ओंमकारा' हा 2006 साली प्रदर्शित झालेला चित्रपट विल्यम शेक्सपीअरच्या ओथेल्लोवर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल भरद्वाज यांनी केलं आहे. चित्रपटातील 'डॉली मिश्रा'ची भूमिका करिनाने साकारली असून चित्रपटाच्या शेवटी ती तिच्या पतीची (अजय देवगणची) हत्या करताना दाखवण्यात आळं आहे. या चित्रपटात करिनाचा पती सैफ अली खानने 'लंगडा त्यागी' ही नकारात्मक भूमिका साकारली आहे.


करिना शाहिदचा हा चित्रपट चांगलाच गाजला


तर 'जब वी मेट' हा 2007 साली प्रदर्शित झालेला रोमँटिक कॉमेडी प्रकारचा चित्रपट असून तो इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात करिनाने तिचा त्यावेळेचा प्रियकर शाहिद कपूरबरोबर मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. करिनाने साकारलं 'गीत' हे पात्र घरोघरात पोहोचलं होतं. करिनाने एका फिल्म फेस्टीव्हलमध्ये 'जब वी मेट'शी कोणतीही मोठी नावं जोडली गेलेली नव्हती. त्यामुळे या चित्रपटाकडून आपल्याला फारशी अपेक्षा नव्हती असं म्हटलं होतं. 'जब वी मेट' हा इम्तियाज अलीचा दुसराच चित्रपट होता. करिना आणि सैफने 2012 साली लग्नगाठ बांधली. 2016 मध्ये त्यांना तैमूर आणि 2021 मध्ये जेह अशी दोन मुलं झाली.