मुंबई : बॉलिवूडचं आयडल कपल करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे नेहमीच चर्चेत असतात. प्रोफेशनल लाइफपेक्षा त्यांचं वैयक्तिक आयुष्य जास्त चर्चेत असतं. यावेळी करीना कपूरला तिच्या ड्रेसमुळे ट्रोल व्हावं लागलं आहे. बी-टाऊनची बेबो फॅशन आणि स्टाइलच्या बाबतीतही खूप पुढे आहे. तिच्‍या सौंदर्यामुळे खूप चर्चाही निर्माण झाली होती, मात्र यावेळी काही लोकांना तिचे कपडे आवडले नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तविक, प्रसिद्ध पापाराजी विरल भयानी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून काही फोटो शेअर केले आहेत ज्यात करीना कपूर तिचा पती सैफसोबत दिसत आहे. या फोटोंमध्ये करिनाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. एकीकडे करिनाची ही फॅशन काही लोकांना खूप आवडली, तर दुसरीकडे काही लोकांनी अभिनेत्रीला प्रचंड ट्रोल केलं.


कमेंट करताना अनेकांनी लिहिलं, 'नाइटी घालून रस्त्यावर निघाली', तर काही लोकांनी लिहिलं - 'ही नाईटी घालून कुठे जात आहे.' करिनाचे हे फोटो सध्या चर्चेत आहेत. या पोस्टवर लोकांच्या भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. करीनाने तिच्या वाढत्या वयातही स्वतःला फिट ठेवलं आहे.



कपल सुट्टीवरून परतलं
सैफ अली खान आणि करीना कपूर नुकतेच आपल्या मुलांसोबत पतौडी पॅलेसला गेले होते. सुट्टी संपवून संपूर्ण कुटुंब मुंबईत परतलं आहे. सैफ अली खान विमानतळावर स्पॉट झाला तेव्हा तो हलका निळा शर्ट आणि पांढरी पँट परिधान केलेला दिसला. त्याने हातात एक पुस्तक घेतलं. त्याचवेळी करीनाने केशरी रंगाचा ट्रॅकसूट परिधान केला होता. तैमूर अली खान राखाडी रंगाचा स्वेटशर्ट आणि काळी पँट घातलेला दिसत होता आणि धाकटा मुलगा जेहला नॅनीने कडेवर घेतलेलं दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.