मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करीना चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आता देखील तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये बेबो भयानक दिसत आहे. फोटोमध्ये करीना एक पदार्थ खाताना दिसत आहे. करीना कपूरला खाण्याची खूप आवड आहे. आवडीचे खाद्यपदार्थ पाहून बेबो सर्व काही विसरते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशावेळी करीना स्वतःच्या तब्येतीचीही काळजी घेत नाही. त्याचंच उदाहरण तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळालं. करीनाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती क्रिसॉ खाताना दिसत आहे. क्रिसॉ खाताना त्याचे डोळे विचित्र दिसत आहेत. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 



करीना कपूर खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ती, 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट यापूर्वी गेल्या वर्षी 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता पण कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आलं.


अनलॉनंतर पुन्हा एकदा शूटिंग सुरू करून रिलीजची तारीख वाढवण्यात आली. आता हा चित्रपट  2022 मध्ये 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डे ला प्रदर्शित होणार आहे.